तेल्हारा(प्रतिनिधी)- दख्खणी मराठा मंडळ,शाखेमार्फत दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत कदम सर, प्रमुख पाहुणे दिनू सुरसे, संस्थापक अध्यक्ष मराठा मंडळ, अकोला. जयेश शिनगारे साहेब, कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन तेल्हारा. प्रभाकर मोरे माजी न.प. उपाध्यक्ष, श्रीकृष्ण पवार
दख्खणी मराठा मंडळ,तेल्हारा अध्यक्ष तेल्हारा. साहेबराव सोनमाळे माजी अध्यक्ष दखनी मराठा मंडळ, तेल्हारा नारायण पवार गुरुजी, मुरलीधर मस्के, सचिन गर्जे , युवक दख्खणी मराठा मंडळ तेल्हारा उमेश शिंदे माजी न. प. सदस्य तेल्हारा सुनिल पवार, चंद्रकांत मोरे,सौ नर्मदा वडणे, सौ. खेरडे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आई तुळजाभवानी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजीराजे भोसले या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण सर्व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले विपरीत परिस्थितीवर मात करून समाजातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे या गुणवंत विद्यार्थ्यांनी मध्ये इयत्ता 12 परीक्षा उत्तीर्ण केलेले कु. साक्षी कदम, कु.श्रद्धा सातपुते, कु.ज्योती वाळके, कु.मयुरी तेलंग, कु.प्रिया इंगळे,व दहावी उत्तीर्ण परीक्षा कु. वैष्णवी गायकवाड, कु.ईशा मोरे, कु.श्रद्धा मोरे, सोमेश पवार, आयुष कदम,पियुष कदम, कृष्णा मोरे, कु.मेघा इंगळे, कु.पायल मोरे, आदित्य पवार, राहुल साळुंके, कु.गायत्री कदम, कु.कंचन भगत, कु.शारदा कामठे, शिव वाबळे,प्रसाद कावळे, या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सर्व पाहुणे मंडळी कडून पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी नारायण पवार गुरुजी, साहेबराव सोनमाळे, प्रभाकर मोरे, दिनू भाऊ सुरसे, चंद्रकांत मोरे, यांनी मार्गदर्शन भाषणे केली
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुनील पवार, श्रीकृष्ण पवार, दिनेश शेळके, सचिन गर्जे, बजरंग गव्हाणे, श्यामल पवार, प्रतीक गटकळ, गौरव इंगळे, शुभम चापे, गोविंद चौधरी, सौरभ कामठे, प्रशांत मोरे, सुरज साळुंखे, अनंत सोनमाळे आदींनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे संचालन कु.पायल मोरे कु.मेघा इंगळे यांनी केले