अकोला दि.28 ‘सखी वन स्टॉप सेंटर’ या योजनेची माहिती जास्तीत जास्त पिडित महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी नुकतेच (दि.21) बुद्ध विहार खडकी, अकोला येथे सखी वन स्टॉप सेंटर व मैत्री फेलो नेटवर्क यांनी संयुक्तरित्या जनजागृतीसाठी माहिती देण्यात आली. याप्रसंगी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक ॲड. मनिषा भोरे व मैत्री फेलो नेटवर्कच्या सुषमा मेश्राम यांनी मार्गदशन केले.
उपस्थितांना माहिती देण्यात आली की, सखी, वन स्टॉप सेंटर अकोला या योजनेच्या माध्यमातुन हिंसाचाराने पिडीत महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलीस सहाय्यता, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, तात्पुरता निवारा, तात्काळ सेवा इ.सोयी सुविधा एका छताखाली निःशुल्क पुरविण्यासाठी दि.10 फेबुवारी 2017 पासुन जिल्हा स्त्री रूग्णालय, वार्ड क.7 मध्ये कार्यरत आहे. ही योजना महिला व बाल विकास विभागाची केंद् पुरस्कृत योजना आहे. संकटग्रस्त हिंसाचार पिडित महिलांना मोफत 24 तास तात्काळ मदत करते. यावेळी वन स्टॉप सेंटरच्या कर्मचारी केस वर्कर रूपाली वानखडे, प्रिया इंगळे, अक्षय चतरकर, रोशन टाले यांचीही उपस्थिती होती.