अकोला,दि. 12: प्रतिबंधीत प्लास्टिक 50 मायक्रोन पेक्षा कमी व प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती तयार करण्याऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्याअनुषंगाने 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक पिशवीचा वापर तथा विक्री व साठवणूक प्रकरणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या.
जवाहर नगर परीसरातील दुकानात प्रतिबंधीत 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडी असलेले प्लास्टिक पिशवी विक्री व साठवूक करण्याऱ्या व्यापारावर कारवाई करुन त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंड व अंदाजे दहा हजाराचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी निमा अरोरा व तहसीलदार सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नितीन निंबाळकर, गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहने बुंदेले, सदस्य सतिश अस्वार, तेजस मुळे, ऋषीकेश आढाव, शुभम झुंज, यश तिचिले यांनी पार पाडली.