अकोला दि.11:- राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशानुसार 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी यांनी सर्व दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था व कारखाने मालक यांनी 14 वर्षाखालील बालकास तसेच धोकादायक व्यवसाय व प्रक्रियेशी संबंधीत उद्योग मालकांनी 18 वर्षाखालील किशोरवयीन कामगारास कामावर कामावर ठेवू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राजु दे. गुल्हाने यांनी केले आहे. तसेच संबंधित व्यवसायाच्या मालक संघटनांनी याची नोंद घेवून याबाबत जनजागृती करावे.
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात त गेल्या वर्षभरात एकुण 31 धाडसत्राव्दारे 508 आस्थापनांना भेटी देऊन 18 बाल व किशोरवयीन कामगारांना मुक्त करुन नऊ आस्थापना मालकाविरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली आहे. उद्योग व व्यवसायात कार्यरत कामगार संघटना, एन.जी.ओ. यांनी नोंद घेऊन बालकामगार काम करताना आढळल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तसेच नजिकच्या पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदवावी, असे कळविण्यात आले आहे.