अकोट (देवानंद खिरकर)- स्थानिक श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट येथे गृह अर्थशास्त्र प्रयोगशाळा व वर्गखोल्या इमारतीचा उद्घाटन समारंभ, विज्ञान शाखा पदव्युत्तर प्रयोगशाळा इमारत आणि संरक्षक भिंत भूमिपूजन तथा गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला.
या समारंभाचे अध्यक्ष मा. श्री हर्षवर्धनजी देशमुख अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. नरेशचंद्रजी ठाकरे उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, प्रमुख अतिथी श्री. संजयभाऊ गावंडे माजी आमदार आकोट, श्री रामचंद्रजी शेळके उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, ऍड गजाननराव पुंडकर उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, श्री. दिलीपभाऊ इंगोले कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, श्री हेमंतभाऊ काळमेघ कार्यकारी परिषद सदस्य, प्राचार्य केशवरावजी गावंडे कार्यकारी परिषद सदस्य, श्री.केशवरावजी मेतकर कार्यकारी परिषद सदस्य, श्री. शशिधररावजी खोटरे, सदस्य महाविद्यालय विकास समिती, श्री. श्यामभाऊ भोपळे, सदस्य महाविद्यालय विकास समिती, अॅड मनोजभाऊ खंडारे सदस्य कनिष्ठ महाविद्यालय विकास समिती, प्राचार्य डॉ. सुनील पांडे हे विचारपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भाऊसाहेब देशमुखांच्या गौरव गीताने करण्यात आली.प्रथमत: उद्घाटकीय भाषणातून नरेशचंद्रजी ठाकरे यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीन विकासकार्याचा आढावा घेत श्री शिवाजी महाविद्यालय हे शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून प्रगतीपथावर आहे असे सांगून यावर्षी महाविद्यालयाच्या तीनही शाखेचे विद्यार्थी मेरिटमध्ये आलेले आहेत ही फार आनंदाची बाब आहे. तुम्ही गुणवत्तेचं बघा आम्ही महाविद्यालयाला भौतिक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करीत राहू असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणातून मा. हर्षवर्धन देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन भाऊसाहेबांनी बहुजनाकरिता शिक्षणाची दार खुली केली त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. तसेच भाऊसाहेबांचे शैक्षणिक, कृषी विषयक कार्यही फार मोठे आहे असे सांगून, मेडिकल कॉलेजमध्ये शेतकऱ्यांना व बहुजन समाजातील व्यक्तींना कमीत कमी खर्चात आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. असे प्रतिपादन करीत या महाविद्यालयाने अधिकाधिक शैक्षणिक प्रगती करावी असे मौलिक मार्गदर्शन केले. अॅड. गजाननराव पुंडकर यांनी आपल्या मनोगतातून गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दिलीपभाऊ इंगोले यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला. तसेच विज्ञान शाखा पदव्युत्तर प्रयोगशाळा व संरक्षक भिंत भूमिपूजनही आज करण्यात आले त्याकरिता आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले.
श्री. केशवरावजी मेतकर यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन महाविद्यालय प्रगतीपथावर आहे असे सांगून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे व स्पोर्टमध्ये पावर लिफ्टिंग स्पर्धेत कलरकोट प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक केले. श्री. हेमंतभाऊ काळमेघ यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये विज्ञान शाखेतून या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अश्विनी हागे प्रथम मेरीट आली व तिचे संपूर्ण न्यूजपेपर मध्ये हेडलाईनवर नाव छापले गले ही आपल्या सर्वांकरीता अभिमानाची बाब आहे, असे सांगितले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त करणाऱ्या विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांचे व क्रीडा क्षेत्रात पावर लिफ्टिंग मध्ये कलरकोट मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ, मेमोंन्टो व यशवंतराव चव्हाण यांच्या नावे शिष्यवृत्ती पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गृहअर्थशास्त्र इमारतीच्या कार्यात ज्यांनी मोलाचे सहकार्य केले अशा मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. अश्विनी फोकमारे व प्रा. डॉ नूतन देशमुख यांनी केले आभार प्रदर्शन कला शाखा प्रमुख डॉ. विलास तायडे यांनी केले. भाऊसाहेबांचे गौरव गीत व पसायदान संगीत विभागाच्या वतीने सादर करण्यात आले. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आकोट व तेल्हारा तालुक्यातील मान्यवर आजीव सभासद, प्रतिष्ठित नागरिक व विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.