अकोट (देवानंद खिरकर)- अकोला जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाच्या विद्यमाने स्थानिक गुरुदेव कॉलनी स्थित श्री शिव गणेश हनुमान मंदिर प्रांगणात विश्व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. परंतु केवळ वृक्षारोपण करुन न थांबता त्यापुढे त्या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. ह्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य दिनकरराव ठाकरे, प्रा. साहेबराव मंगळे, कृ. उ. बा. स. चे प्रशासकीय संचालक निलेश पाचडे, नागोराव वानखडे, सौ.मीराताई कोरपे यांची उपस्थिती होती. तर बाळकृष्ण वाकोडे, रघुनाथराव गावंडे, प्रदीप डुडुल, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय आठवले, अकोला तालुकाध्यक्ष विजय देशमुख, तालुकाध्यक्ष प्रशांत पाचडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश हाडोळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक काँग्रेस पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष अनंत गावंडे यांनी आयोजनामागील भूमिका व वृक्षारोपण संरक्षण व संवर्धन याबाबत आपल्या प्रास्ताविकातून माहिती दिली. कोरोना काळात मानवाला ऑक्सिजनची किंमत कळली. आणि तो ऑक्सिजन वृक्ष देतो म्हणून वृक्षरोपण व त्याचे संरक्षण व संवर्धन होणे काळाची गरज आहे.
विकास नावाच्या ब्रह्मराक्षसाने मोठ मोठी झाडे तोडलीत. ही हानी भरून काढण्याकरिता काँग्रेसचा हात पर्यावरण रक्षणाला साथ हा उपक्रम राबवून वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे. वृक्षारोपणसोबतच वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करणार आहोत अशी माहिती यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अमानकर यांनी दिली. मीराताई कोरपे, प्रशांत पाचडे यांची समयोचित भाषणे झालीत कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन व उपक्रमाबद्दल माहिती संजय आठवले यांनी दिली. कार्यक्रमाला उपासणी, मयुर निमकर, प्रतिक गोरे, पप्पु गावंडे, गौरव मंगळे, प्रविण भगत, रत्नदिप बोंदरे, चेतन गुरेकर, शाहरूखखान, श्रीमती. मोगरे मॕडम, सौं. रहाटे, सौ. डालके, सौ. पारसकर, शकुंतलाबाई कुटे, सौ. विद्याताई ठाकरे, सौ. ऊमा वाकोडे यासह नागरीकांची उपस्थिती होती.