लोणावळा, 24 मे : दिल्लीतील एक अभियंता शुक्रवारी (20 मे 2022) लोणावळ्याच्या जंगलात हरवला होता. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. फरहान शहा असं त्याचं नाव आहे. त्याच्या शोधासाठी एनडीआरएफ, लोणावळा ग्रामीण पोलीस, मावळ वन्यजीव सरंक्षक आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक कार्यरत होते. आज शोधमोहिमे दरम्यान फरहान शहा याचा मृतदेह आढळून आला आहे.
लोणावळा आणि खंडाळाच्या घनदाट झाडीत हरविलेल्या अभियंत्याचा शोध घेण्यासाठी NDRF चं पथक पोहचलेलं. तत्पूर्वीच आज सकाळी आयएनएस शिवाजीच्या जवानांना दरीतून दुर्गंधीचा वास आला होता. त्याच दिशेने NDRF चे जवान दरीत उतरले. तिथं फरहाणच्या टी शर्ट आढळला. फरहान याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. फरहानच्या शोधासाठी आज श्वान पथक ही दाखल झालं होतं.