अकोला (प्रतिनिधी)- आज23 रोजी पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदार कडुन खात्रीलायक बातमी मिळाली कि अकोट रोड वरील विजय किराणा मध्ये एक इसम पैश्याच्या हारजीत वर वरली मटका जुगार खेळत आहे अश्या खात्री लायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहाणी करून रेड केली असता तेथे (1)विजय नामदेव राव निबाळकर वय 47 रा. दमाणी हॉस्पिटल जवळ अकोला (2)मो. रफिक मो. शाकील वय 25 रा सोलासो प्लॉट (3)अनिल परशुराम वसू 41रा. वसू टाकळी .हे मिळून आले. त्यांच्या कडे वरली मटका साहित्य,,नगदी. 1890रु.,3 मोबाईल फोन 26,000रु. असा एकूण 27,890रु.चा मुद्देमाल मिळून आला ..त्यांचे हे कृत्य महा. जु. का.अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन अकोट फाईल येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक .. जी श्रीधर , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी व त्यांचे पथकाने केली आहे.