आजपासून Call Recoarding चे सर्व App Google कडून बॅन करण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही थर्ड पार्टीला कॉल रेकॉर्डिंग अॅप वापरून कॉल रेकॉर्ड करता येणार नाही. गेल्या महिन्यात google ने घोषणा केली होती की, त्याच्याकडून सर्व Call Recording App ला Play Store वरून बॅन करण्यात येईल. Play Store ची ही पॉलीसी आज ११ मेपासून लागू होत आहे. ज्यांच्या फोनमध्ये रेकॉर्डिंग फीचर इनबिल्ड आहे, त्यांच्या फोनमध्ये हा परिणाम दिसणार नाही.
टेक जायंट हे Google call recording app सर्विसच्या विरोधात आहे. कंपनीचे स्पष्ट केले आहे की, हे App यूजर्सच्या प्रायव्हसीविरोधी आहे. जेव्हा Google च्या Dialer App वरून, कॉल रेकॉर्ड केला जातो, तेव्हा साईड यूजर्सला याची सूचना दिली जाते. Google ने स्पष्ट केले आहे की, या बदलाचा परिणाम थर्डपार्टी ॲपपासून ते कॉल रेकॉर्ड करणाऱ्या यूजर्सपर्यंत पडणार आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये इनबिल्ड कॉल रेकॉर्डिंग अॅप असेल तर यामध्ये कोणताही बदल होणार नाही. आपल्या देशात रेकॉर्डिंग कॉल कायदेशीर आहे की नाही यावर देखील रेकॉर्डिंग कार्यक्षमता अवलंबून असेल. सध्या तरी भारतात कॉल रेकॉर्ड केले जाऊ शकतात. तुमच्या फोनमध्ये इनबिल्ड कॉल रेकॉर्डिंग अॅप फीचर दिलेले असेल तर, तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय कॉल रेकॉर्ड करू शकता.
नवीन Google Play Store धोरणानुसार, कंपनी कोणत्याही थर्ड पार्टी अॅपला Android फोनवर Google च्या Accessibility API वापरण्याची परवानगी देणार नाही. कंपनीने Android 10 वर कॉल रेकॉर्डिंग फीचर बंद केले होते. ज्याच्या सहाय्याने कॉल रेकॉर्डिंग अॅप फोममधील API चा वापर करून कॉल रेकॉर्ड करत होते, यामुळे अॅपला वापरकर्त्याला इतर गोष्टींचाही Access मिळत होता, ज्याचा डेव्हल्परकडून गैरवापर केला जात होता, ही गोष्ट लक्षात घेत, Google ने आपल्या धोरणांमध्ये बदल केला आहे. आता, Call Recoarding App ला API चा Acess दिला जाणार नसल्यामुळे कॉल रेकॉर्डिंग करता येणार नाही.