• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गंगाखेड मध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यास प्रतिसाद

adil by adil
May 7, 2022
in Featured, कार्यक्रम, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
83 1
0
Marathi Press Council
13
SHARES
601
VIEWS
FBWhatsappTelegram

परभणी(प्रतिनिधी)-  मराठी पत्रकार परिषद मुंबईच्यावतीने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा गंगाखेड येथ्लृे शुक्रवार, 6 मे रोजी घेण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या शेकडो पत्रकार व पदाधिकार्‍यांची एकजूट यानिमित्ताने पहावयास मिळाली.

दरवर्षी घेण्यात येणारा राज्यातील आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा परभणी जिल्ह्यातील संत जनाबाईची जन्मभूमी असलेल्या गंगाखेडनगरीत घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस बाळशास्त्री जांभेकर, संत जनाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख, स्वागताध्यक्ष गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, प्रमुख वक्ते म्हणून न्यूज एटीएनचे वृत्त निवेदक विलास बडे यांची उपस्थ्लिृती होती. स्वागतपर भाषण करतांना पिराजी कांबळे यांनी गंगाखेड नगरीचे ऐतिहासिक महत्व विषद करत कार्यक्रम घेण्याची भूमिका मांडली.  परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांनी मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांसाठी केलेल्या कामाचा आढावा घेत, पत्रकार संरक्षण कायदा, पेन्शन योजना आदी प्रश्‍न मार्गी लावल्याचे स्पष्ट केले.  मेळाव्यानिमीत्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे मान्यवरांच्याहस्ते विमोचन करण्यात आले. परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी विचार व्यक्त करतांना समाजाने पत्रकारांच्या मागे उभे राहणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच पत्रकारांनीही परिषदेच्या पाठीमागे उभे राहून आपली शक्ती दाखवण्याची वेळ असल्याचे सांगितले.  परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मस्थ्लृळी भव्य स्मारक उभे करण्यात आले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. परिषदेकडे सभासद नोंदणी करून जास्तीत जास्त वर्गणी पाठविण्याचे आवाहन केले. याप्रसंगी स्वागताध्यक्षीय भाषणात आ.गुट्टे म्हणाले, कै.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीसाठी शासनाने यावर्षी 25 कोटी रुपये दिले आहेत. तसेच छोट्या वृत्तपत्रासाठी जाहिरात दरही वाढविण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी 2014 व 2019 मध्ये त्यांनी लढविलेल्या विधानसभा निवडणुकीचा विजय व पराभव याबद्दल सविस्तर विवेचन करत आलेल्या अडचणींवर कशी मात केली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

याचा उहापोह केला. परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख हे पत्रकारांसाठी कशाप्रकारे परिश्रम घेत आहेत, याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. वृत्त निवेदक विलास बडे यांनी कार्पोरेट पत्रकारिता कशाप्रकारे सुरु आहे, याबद्दल विवेचन केले. भारत देश आपण खेड्याचा संबोधतो परंतु मोठे वृत्तपत्र केवळ ग्रामीण भागाला 0.67 टक्के प्रसिद्धी देत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीसारख्या ठिकाणचे प्रश्‍न 68 टक्के मांडण्यात येत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागावर अन्याय होत असून त्यांचे प्रश्‍न दाबले जात असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोप करतांना परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी गेल्या दोन वर्षापासून पत्रकारांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री महोदय पत्रकारांना भेटण्यास वेळ देत नाहीत.  अशावेळी पत्रकारांनी करायचे काय? असा प्रश्‍न उपस्थ्लिृत केला.

समाज तसेच प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे मालक देखील पत्रकारांसोबत नसल्याने त्यांच्यापुढे मोठे आव्हान असल्याचे नमूद केले. पत्रकारांनी यासाठी एकत्र येऊन संघटन मजबूत करणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. छोटी वर्तमानपत्रे जगली पाहिजे, मोठा वृत्तपत्र समुह असलेले (लोकप्रभा) सारखे साप्ताहिक बंद झाले. यामुळे येणारा काळ वृत्तपत्रासाठी कठीण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार संरक्षण कायदा झाला परंतु त्याची राज्यात अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त केली. येणार्‍या 17 मे रोजी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांना या दिवशी सर्व पत्रकारांनी एसएमएस पाठवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठीच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर राजेभाऊ फड, गणेश रोकडे, किसन भोसले, बालासाहेब निरस, ऍड.संतोष मुंडे, विष्णू मुरकूटे, संदीप अळनुरे, तुकाराम मुंडे, विजय जोशी, अनिल महाजन, सुरेश नाईकवाडे, प्रकाश कांबळे, विशाल साळूंके, नंदकुमार महाजन, अनिल वाघमारे आदींची उपस्थ्लिृती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब राखे यांनी केले तर आभार गोविंद चोरघडे यांनी मानले.
पुरस्कार विजेते तालुका पत्रकार संघ
कोल्हापूर विभाग सिंधुदूर्ग जिल्हा सावतंवाडी, कोकण विभाग                                                                                               गुहागर पत्रकार संघ, नाशिक विभाग जामखेड, पुणे विभाग फलटण,                                                                                           अमरावती विभाग रिसोड, नागपूर विभाग नरखेड, औरंगाबाद विभाग                                                                                              सिल्लोड, लातूर विभाग नायगाव

Tags: GangakhedMarathi Press Councilstate
Previous Post

तलवारीसह धारदार शस्त्र साठा जप्त,विशेष पथकाची हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अडगाव येथे कारवाई

Next Post

रत्नागिरी : पाच हजार गरिबांच्या घराचे ‘स्वप्न’ पूर्ण

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
0bbad4d2-811c-4b10-aa15-55bc5781

रत्नागिरी : पाच हजार गरिबांच्या घराचे ‘स्वप्न’ पूर्ण

वारी येथील कुख्यात मामा भाचा डोहाने घेतला एकाच आठवड्यात दुसरा बळी

वारी येथील कुख्यात मामा भाचा डोहाने घेतला एकाच आठवड्यात दुसरा बळी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.