अकोला,दि.३: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक मीरा पागोरे,तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.