सिरसोली (विनोद सगणे)- आज दिनांक ३ मे रोजी वंचित बहुजन आघाडी शाखा शिरसोली कडून ईद निमित्त सामाजिक सलोख्याचे दर्शन पाहावयास मिळाले आज सिरसोली येथे रमजान ईद उत्साहात पार पडली यावेळी सिरसोली येथील वंचित बहुजन आघाडी शाखा सिरसोली कडून ईद निमित्त मुस्लिम बांधवांसाठी थंड शरबताची व्यवस्था त्रिमूर्ती मैदान समोर करण्यात आली वंचित बहुजन आघाडी शाखा सिरसोली कडून राबविल्या गेलेल्या उपक्रमा बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी धम्मपाल दारोकार , राहुल भारसाकळे, रमण वानखडे, रणजीत भारसाकळे, विवेक इंगळे,अनिल भारसाकळे, तेजराव दामोदर, दिलीप भारसाकळे, दीलीप धांडे, अरुण भारसाकळे, भिमराव भारसाकळे,विजय भारसाकळे,रमेश भारसाकळे,विश्वनाथ भारसाकळे, भगवान वानखडे, अनिल तायडे, दादाराव पाखरे, बाबाराव पाखरे, गौतम भारसाकळे, विकास भारसाकळे, भारत भारसाकडे,सिध्दार्थ धुंदे,अरुण भारसाकडे,प्रितम भारसाकळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी शाखा सिरसोली येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.