अकोला: ज्येष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे यांनी अनेक आंदोलने करून माहितीचा अधिकार मिळून घेतला आहे. त्यामुळे आता जनतेने दुसऱ्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी माहितीच्या अधिकाराची कास धरावी असे आवाहन गजानन हरणे, ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक, निर्भय बनो जनआंदोलन यांनी विश्रामगृह अकोला येथे 1मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनी, दक्षता जनजागृती अभियान अंतर्गत आयोजित कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना केले.
या कार्यशाळेचे आयोजन अँटी करप्शन अँड मिडिया इन्वेस्टीगेशन अकोला जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश नागे उप विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला हे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन चे गजानन हरणे हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते .
तर प्रमुख अतिथी म्हणून सौ प्रतिभा काटे, समाजसेविका, प्रमोद पांडे पत्रकार, विजय तेलगोटे जिल्हाध्यक्ष, गणेश अंभोरे , पवन वानखडे, सौ सागळे ताई एडवोकेट तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर गणेश इंगळे यांच्या गायनाने झाली. कार्यक्रमाचे संचालन गजानन सावळे यांनी तर आभार प्रदर्शन सौ संगीता मराठी यांनी केले या कार्यक्रमाला अकोला व वाशिम जिल्ह्यातील अँटी करप्शन मिडीया इन्वेस्टीगेशन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये कामगार कायदे, माहितीचा अधिकार, रेशन गॅस संबंधीचे कायदे, ग्राहक संरक्षण कायदा, दप्तर दिरंगाई सेवा अधिनियम चा कायदा, दारूबंदीचा कायदा आदी अनेक कायदा बाबत सविस्तर असे मार्गदर्शन श्री गजानन हरणे यांनी केले .कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला.