अकोला दि.2: राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार,निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणूकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबवावयाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर या तालुक्यातील एकूण 125 ग्रामपंचायतीमधील 207 रिक्तपदाच्या पोट निवडणूका घेण्यात येणार आहे.
त्याचा तपशिल याप्रमाणे
अ.क्र. | तालुक्याचे नाव | ग्रामपंचायतीची संख्या | रिक्त पदाची संख्या |
1 | तेल्हारा | 06 | 9 |
2 | अकोट | 22 | 49 |
3 | मुर्तिजापूर | 35 | 61 |
4 | अकोला | 21 | 29 |
5 | बाळापूर | 12 | 16 |
6 | बार्शिटाकळी | 20 | 32 |
7 | पातूर | 9 | 11 |
एकूण | 125 | 207 |
निवडणूक असलेल्या क्षेत्रामध्ये निवडणुक कार्यक्रम लागल्यापासुन आचारसंहिता लागू झाली असून;आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील.
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दि.5 मे 2022 असुन नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया दि. 13 मे पासुन सुरु होणार आहे. दि. 20 मे पर्यंत उमेदवारांना उपरोक्त कालावधीत दि. 14, 15 व 16 मे रोजीचे सार्वत्रिक सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 11 ते दुपारी तीन पर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा दि. 23 मे असुन दि.25 मे दुपारी तीन वाजेपर्यत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. तसेच निवडणुक चिन्ह नेमुन देण्याचा तसेच दि. 25 मे दुपारी तीन वाजेनंतर अंतिमरित्या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी करण्यात येणार असुन आवश्यक असल्यास मतदान दि. 5 जुन 2022 रोजी सकाळी साडेसात वाजेपासुन ते सायं साडेपाच वा. पर्यंत होणार आहे. मतमोजणीचा दि. 6 जून असुन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुक निकालाची अधिसुचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक 9जून 2022 आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं.,जि.प., पं.स. निवडणूक विभाग, अकोला यांनी कळविले आहे.