अकोला(सुनील गाडगे)- बार्शिटाकळी येथील रहिवासी मो.इकबाल मो.सादीक यांच्या मालकीचे मंगरूळपीर रोडवरील सोयाबीनच्या कुटारा पासुन बनविण्यात येणा-या गटटुच्या कारखाण्याला आज सकाळी अं. 9:30 वाजताच्या दरम्यान आग लागली होतो आग ऐवढी भिषण होती की अक्षरशः गटटुसाठी साठवून ठेवलेल्या भल्या मोठया प्रमाणावर असलेली कुटारीची गंजीने पुर्णपणे पेट घेतला होता यात टीन शेडसह इतर सामग्रीचे नुकसान झाले यात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालीनाही. यावेळी अग्निशमन दलाची यंत्रणा पोहचे पर्यंत मजुर तथा मालकासह नागरिकांची धावाधाव चालु होती. डीस्टंस पाडुन कव्हरिंग दिल्यामुळे लागुनच असलेल्या नविन गोडाऊनला वाचवता आले एका तासाने अकोला आणी पातुर मुर्तीजापुर येथुन आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविणे चालु केले असता अध्यापही आग विझविणे चालुच आहे. यावेळी येथे तहसीलदार गजानन हामंद सर, नगराध्यक्ष महेफुजखान भाई,बार्शिटाकळी चे ठाणेदार आणी त्यांचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.दयावान इंडस्ट्रीज चे मो.रफीकभाई यांच्या सह स्थानिक नागरिकांनी मोठी मदत केली.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे .