अकोला– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विविध कार्यक्रम राबवित आहे. त्यानुसार शुक्रवारी(दि.15) मागावर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, अकोला येथे महिला मेळावा कार्यक्रमात महिलांचे हक्क व सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सामाजिक समता कार्यक्रम समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विशेष अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रदीप सुसतकर तर . प्रमुख पाहुणे गृहपाल श्रीमती चेडे, श्रीमती कुलकर्णी उपस्थित होते. प्रज्ञा ठाकरे यांनी महिला सक्षमीकरण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलासाठी केलेल्या कार्याचे माहिती देवून जीवनस्तर उच्चस्तरावर कसे नेता येईल या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एस.ठाकरे यांनी तर सुत्रसंचालन समता तायडे, व आभार प्रदर्शन वैशाली गवई यांनी केले. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी समाजकल्याण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी व समतादुत सदस्य यांनी योगदान दिले.