तेल्हारा शहरा सह तालुक्यात भिमजयंती कोरोना च्या दोन वर्षाच्या ब्रेक नंतर सुद्धा तोच आनंद जलोश कमी झालेला दिसला नाही यात गेल्या आठवड्या भऱ्या पासून विविध सामाजिक उपक्रमाने सुरुवात झाली
यात मिलिंद मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता मैरोथान स्पर्धा,महापुरुषांच्या जीवनावर आधारीत स्पर्धा परीक्षा,14 तास अभ्यास उपक्रम,करून सुरुवात झाली त्यानंतर 14 एप्रिल ला सकाळी सम्पूर्ण शहरांतून ,मिलिंद मंडळ,भीम मंडळ,पंचशील मंडळ,सिध्दार्थ मंडळ,इंदिरा मंडळ सह इतर मंडळ भारिप बहुजन महासंघ,वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, यांचे पदाधिकारी मोटार सायकलरॅली,चे आयोजन करून सम्पूर्ण तेल्हारा शहरात ”जय भीम” च्या जयघोषात शहर दुमदुमून गेले होते तर सायंकाळी भव्य दिव्य सार्वजनिक मिरवणुका, काढण्यात आल्या ज्यात मिलिंद मंडळ,सिद्धार्थ मंडळ,पंचशील मंडळ,भिम मंडळ,इंदिरा नगर मंडळ,सहभागी झाले होते रॅली टॉवर चौक,पोलीस स्टेशन मार्ग ,शिवाजी चौक मार्ग,संत तुकाराम चौक मार्ग डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान मध्ये ढोल ताशे फटाके आतिषबाजी च्या वातावरणात सामूहिक त्रिशरन पंचशील घेऊन समारोप करण्यात आला त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवा निम्मित भीम बुद्ध गीतांची संगतीमय मैफिल द्यारे सम्पूर्ण शहर संगीतमय झाले होते विविध कलाकार यांनी आपली भीम बुद्धाच्या गीताच्या संगीताने शहर भारून निघाले सम्पूर्ण जयंती उत्सवात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याबाबत तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता!
विविध शासकीय कार्यालयात महामानवाला अभिवादन
तेल्हारा तालुक्यातील प्रमुख कार्यालया ज्यामध्ये तहसील कार्यालय, पंचायत समिती,पोलिस स्टेशन,नगर परिषद, विविध जिल्हा परिषद, विद्यालय, कॉलेज ,कृषी अधिकारी कार्यालय,वान प्रकल्प कार्यालय,तालुका भूमिअभिलेख कार्यालय,महावितरण उपअभियंता कार्यालय,ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,कृषी उत्पन बाजार समिती कार्यालय,उपकोषगार कार्यालय बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, आदी कार्यालयांत महामानवाला अभिवादन करण्यात आले
विविध पक्ष संघटना द्यारे महामानवाला डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात अभिवादन
तेल्हारा तालुक्या सह शहरातील विविध पक्ष ज्यात वंचित बहुजन आघाडी,भारिप बहुजन महासंघ,भारतीय बौद्ध महासभा,भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,भारतीय जनता पक्ष, शिवसेना,प्रहार जनशक्ती पक्ष,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट,गवई गट,पीपल्स रिपब्लिकन पार्टी,माळी महासंघ,च्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सह विविध संस्था,संघटना यांनी पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन केले