दहीहंडा- अकोट उपविभागा अतर्गत येत असलेल्या दहीहांडा येथे अवैध रेती वाहतुक करत असल्याची माहीती दहीहांडा ठानेदार सुरेन्द्र राऊत याना मीळाली याच्या आधारे सापळा रचुन एम एच 30 पी 3124 महीद्रा कंपनीचा ट्रैक्टर किमंत 4 लाख 75 हजार रूपये व आरोपी कीशोर गजानन सुरतकार वय (31) सोहेल पठान रा. रेल याना 5 हजार रूपयाच्या अवैध वाळु सह ताब्यात घेतले आहे.
दहीहांडा पोलीस स्टेशन अतर्गत काही भागात अवैध वाळुची वाहतुक होत असल्याची खात्री लायक माहीती दहीहांडा ठाणेदार याना मीळताच कारवाई करत 5 लाख 25 हजाराचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे तसेच कायदेशीर कारवाई ही करण्यात आली आहे मात्र येथील पटवारी व महसूल विभागाच्या आशिर्वादाने होत असलेली अवैध वाळु वाहतुकीला लगाम लागनार तरी कधी समंधीत अधीकारी व कर्मच्यारी हे अर्थपूर्ण वाळु माफीया याना सहकार्य करत असल्याची परीसरात चर्चा आहे तरी महसुल विभागाच्या वरिष्ठ अधीकार्यानी या प्रकरणाची दखल घेत परीसरात वाळु वाहतुकीला लगाम लावावा अशी मागणी होत आहे.