तेल्हारा- आज हिवरखेड पोलिसांनी शेतकरी बजरंग दल कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल प्रकरणात तेल्हारा बंदची हाक देण्यात आली होती त्याला शहरातील व्यावसाईकांनी उत्तम प्रतिसाद देत कडकडीत बंद पाडला यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
९ एप्रिल रोजीच्या पहाटे 2 ते 3 वाजेच्या सुमारास दानापुर शेत शिवारात शेतक – यांना ४० गोवंशज संशयास्पद जाताना दिसले सदरची माहिती त्यांनी पोलिस यंत्रणेला भ्रमणध्वनी वरुन दिली हिवरखेड येथील गोरक्षक रवि गावंडे यांनी स्वतः रात्री 2 वाजता पोलिस स्टेशनला जावुन ४० गोवंश शेतक – यांनी पकडल्याची माहिती पोलिसांना दिली त्या बातचे पोलिस स्टेशनचे सिसि टिव्ही फुटेज तपासल्यास वास्तव समोर येईलच त्यांच्या माहितीवरुन व स्थानिक शेतक – यांच्या माहितीवरून हिवरखेड पो.स्टे . चे 3 कर्मचारी शासकीय वाहनासह पोलिस उपनिरीक्षक दातीर , यांच्यासह दानापुर शेत शिवारात दाखल झाले शेतक – यांना संशया स्थितीत मिळालेले ४० गोवंश त्यांनी ताब्यात घेतले . परंतु पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने व गोवंश हे पाई जात असल्या कारणाने दाखल झालेल्या पोलिसांनी संशयास्पद पकडलेले गोवंश पोलिस स्टेशन पर्यंत घेवून चालण्यास शेतक – यांना व स्थानिक युवकांना विनंती केली . त्यावरून पोलिसांना मदत करण्याच्या उद्देशाने दानापुर शेत शिवारातील शेतकरी व स्थानिक युवक यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेले ४० गोवंश घेऊन हिवरखेड पोलिस स्टेशनच्या दिशेने निघाले असल्याचे तेव्हा ४० गोवंशच्या मागे पोलिसांची शासकीय चार चाकी वाहन चालत असल्याचे अनेक चित्रफित उपलब्ध आहेत . सकाळी ७ वाजताच्या सुमारास हिवरखेड पो.स्टे . हद्दीतील सोनवाडी फाटया जवळ गोवंश हाकलत असणा – या युवकांना काही समाज कंटकांनी अडवून पोलिसांच्या ताब्यात असलेली ४० गोवंश सोडून देण्यास सांगितले परंतु पोलिसांनी व युवकांनी ४० गोवंश पोलिस स्टेशनला नेणार असल्याचे सांगितल्या वरून वाद निर्माण झाला त्यावरुन जमावाने गोरक्षकांवर लाठी काठी शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करत त्यांना जखमी केले . तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ४० गोवंशा पैकी ३६ गोवंश पसार केले , गोरक्षकांना अडविण्यासाठी आलेल्या समाज कंटकांमध्ये सादिक नामक व्यक्ती तिथे हजर असतांना व तशा अनेक चित्रफिता उपलब्ध आहेत तरी सुध्दा त्याचेवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही .
उलट गोरक्षक रवि गावंडे यांनी कायदयाच्या चाकोरीत राहत पोलिसांना सदर संशयास्पद गोवंशा बाबत माहिती दिली असतांना त्यांनाच आरोपी बनविण्यात आले . हिवरखेड ठाणेदार लांडगे हे सदर घटनेचे प्रत्यक्षदर्शि नसतांना सुध्दा त्यांनी सदर घटनेची फिर्याद देत गोवंशाना जिवन दान देणा – या सर्व सामान्य शेतकरी व गोरक्षक युवकांवरच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करत त्यांना खोटया गुन्हयात अडकवल्यामुळे ठाणेदार लांडगे यांचेवर कठोर कारवाई व्हावी करीता अशा आशयाचे सदरचे निवेदन तहसीलदार कार्यालय पोलिस स्टेशन मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय अकोला विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांना देण्यात आले यावेळी बजरंग दल विहीप गौरक्षक शेतकरी व हींदु बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.