डॉ. गो. खे. महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा विशेष शिबिर समारोप संपन्न
तेल्हारा(प्रतिनिधी)- स्थानिक गोपाळराव खेडकर महाविद्यालयाच्या रा. से.यॊ पथकाचा विशेष शिबिर दत्त ग्राम हिंगणी बु. येथे समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.गजाननराव पुंडकर साहेब उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून मा. केशवराव गावंडे सर कार्यकारणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जे. ढोले जातीने हजर होते तसेच विशेष निमंत्रित म्हणून मा. बाळासाहेब मार्के आजीवन सभासद मा. नारायणराव देवतळे, आजीवन सभासद मा. बाळासाहेब सोनमाळे आजिवन सदस्य मा. श्यामशीलजी भोपळे, सी. डी. सी. सदस्य अकोट मा. अशोकराव नराजे, सौ सविता मांडवकर, सरपंच हिंगणी बु. मा. हरिदास वाघ सरपंच हिंगणी खु., मा. चेतन नराजे, मा. श्रीकांत कोरडे, मा. शुभम वाघ, इ. मान्यवर मंचावर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जे. ढोले यांनी केले मान्यवरांनी शिबिरार्थींना अमोल मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. रमेश लोणकर यांनी संचालन केले तर आभार प्रदर्शन श्री रोशन अहेरकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी करिता सह. कार्यक्रमाधिकारी प्रा. जी. ओ. जोंधळेकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. फरसोले, अश्विनी लोणकर मॅडम, मंगेश देवतळे, सचिन ढोले, अभिजीत लोखंडे, जितू नराजे, गावकरी मंडळी शिबिरार्थी यांनी अथक परिश्रम घेतले
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.जे. ढोले यांच्या मार्गदर्शनात पार पडला