तेल्हारा: संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या तेल्हारा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकित भाजप शेतकरी पॅनल ने बाजी मारीत 13 पैकी बारा जागेवर विजय मिळविला तर विरोधी गटाच्या एका उमेदवाराला केवळ सात मतांनी विजय झाला काही दिवसांनी होऊ घातलेल्या सहकार क्षेत्रातील व नगर परिषद च्या निवडणूक बघता ही निवडणूक रंगीत तालीम म्हणून बघितल्या जात होती हे विशेष
या संस्थेच्या निवडणूक मध्ये भाजप शेतकरी पॅनल आणि शेतकरी सहकार महाविकास आघाडी हे दोन्ही गट अमोरासमोर उभे ठाकले होते दोन्ही गटातील नेत्याच्या अस्तित्वाची निवडणूक म्हणून या निवडणुक कडे बघितल्या जात होते एकीकडे भाजप व शेतकरी पॅनल तर दुसरीकडे शेतकरी सहकार पॅनल ची नेतेमंडळी तसेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार ची नेतेमंडळी होती मात्र मतदारांनी भाजप शेतकरी पॅनल च्या उमेदवारांना एकहाथी सत्ता दिली.
या मध्ये भाजप शेतकरी पॅनल चे उमेदवार बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक संदीप रमेशराव खारोडे यांना 586 मते गजानन नळकांडे 612 योगेश बिडवे 572 ,सुदेश शेळके 551 गजानन मामणकार 549 गजानन नेमाडे 537 श्रीराम कडू 530 सतीश चहाजगुणे 511 सतीश जयस्वाल 626 ज्योती नेमाडे 611 गीताबाई वाकोडे 586 सुनील तायडे 631मते घेऊन विजयी झाले मात्र भ.वि.जा मतदारसंघातुन शंकर ढेंगे 549 मते पडली मात्र ते सात मतांनी पराभूत झाले तर विरोधी गटाचे गजानन कडू 410 राजेश काटे 457 प्रमोद गावंडे 447 गणेश ढवळे 414 कैलास ढोकने 422 विपीन देशमुख 423 निलेश धनभर 431 प्रकाश वाकोडे 453 वासुदेव नासने 432 कल्पना गावंडे 514 निलेश नेमाडे 464 मते घेऊन पराभूत झाले मात्र भविजा मतदारसंघातुन श्याम घोंगे 556 मते घेऊन केवळ सात मतांनी विजयी झाले अपक्ष उमेदवार ऋषिकेश शिंगणे यांना 50 श्रीरंग पोहरकार 25 मते पडली.