अकोट(देवानंद खिरकर)- जि.प.शाळेमध्ये जागतिक जलदिनानिमित्त लघुपाटबंधारे विभाग शहापूर यांच्या वतीने गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व जलशपथ घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी श्री.साल्पेकर(उपविभागीय अधिकारी)व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. याच कार्यक्रमाचे निमित्त साधुन मा. प्रकाश आतकड (जि.प.सदस्य) यांनी आपल्या निधिमधुन शाळेला बोअरवेल व पाणीटाकी साठी एकुण 2.40 लाख रुपये कामाचे भुमिपुजन मा. प्रकाश आतकड यांच्या शुभहस्ते पार पडले.
तसेच मा.प्रकाश आतकड यांनी शाळेच्या रंगरंगोटीसाठी 1 लाख रुपये निधी 15 व्या वित्त आयोगातुन देण्याचे आश्वासन दीले.मा.प्रकाश आतकड यांनी शाळेला भरघोस निधि दिल्याबद्दल शाळेच्या वतीने श्री शेख सलीम (अध्यक्ष शा.व्य समिती) यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. तसेच मा.मनोज बोन्द्रे (अध्यक्ष से.सह.सोसायटी) यानी शुद्धा शाळेच्या विकासासाठी ५००० रु निधी दीला. मा.कीशोर बोन्द्रे (सरपंच) यांनी ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्तआयोगातुन शाळेला ६०००० रु फर्निचर देण्याचे आश्वासन दीले.गावातील श्री.शेख सलीम, डॉ. संजय महाले,श्री डिगांबरराव तायडे, श्री. कीशोर पाटील, श्री देवकुष्ण महाले, श्री. बाळासाहेब बोन्द्रे (मा.जि.प.सदस्य), श्री.प्रकाश आतकड श्री नागरे सर यांनी शाळेला एक एक सिमेंट बेच भेट दीला. शाळा व्यवस्थापन समितीतील प्रत्येक सदस्यांनी शाळेच्या विकासासाठी प्रत्येकी ५०००रु निधी देण्याचे आश्वासन दीले.
कार्यक्रमाला मा. प्रकाश आतकड (जि.प.सदस्य) मा. साल्पेकर साहेब (उपविभागीयअ) मा. शेख सलीम (अध्यक्ष) मा.कीशोरभाउ बोन्द्रे (सरपंच) मा.डिगांबरराव तायडे (सदस्य)मा.डॉ.महाले, सौ. छायाताई ढोक (उपाध्यक्ष) मा. मनोज बोन्द्रे,मा. दिपक ताराम,मा.गौतम तायडे,देवकुष्ण महाले, हरीदास सुरत्ने, संजय बोन्द्रे, संजय शेंद्रे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोळंके मँडम, बिहाडे मँडम, ढोरे सर, भलावी मँडम, खोटरे मँडम, रोहनकार मँडम, जली मँडम श्री. नागरे सर यांनी प्रयत्न केले.