अकोला दि.22 अकोला सिंचन मंडळ व अकोला पाटबंधारे विभागाच्यावतीने जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा मुख्य उद्देश पाण्याची बचत व पाण्याचा वापर काटकसरीने करणे तसेच पाण्याचे महत्व जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे आहे. याकरीता नेहरु पार्क, अकोला येथून ‘वॉटर रन’ ला अकोला सिंचन मंडळचे कार्यकारी अभियंता स्मिता मानकर व उपअधीक्षक अभियंता शिल्पा आळशी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
नेहरु पार्क येथून गोरक्षण मार्गाने संत तुकाराम चौक व परत नेहरु पार्कपर्यंत वॉटर रन व चित्ररथाव्दारे जलजागृती करण्यात आले. यावेळी अकोला सिंचन मंडळ व अकोला पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’, ‘पाणी बचाव’ अशा घोषणा देत जनजागृतीचे संदेश नागरिकापर्यंत पोहोचविले. यावेळी अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.खु.वसुलकर, अकोला सिंचन मंडळचे कार्यकारी अभियंता स्मिता मानकर, उपअधिक्षक अभियंता शिल्पा आळसी, उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, शाखा अभियंता गोपाल चव्हाण, अकोला पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.