अकोट (देवानंद खिरकर) – पणज येथे तुकाराम महाराज बीज व शिवजयंती उत्सव खोट्या प्रतिष्ठेसाठी काही लोक कर्जबाजारी होऊन प्रचंड खर्च करतात.मग ते फेडण्याची हिंमत नसल्याने आत्महत्येसारखा मार्ग निवडतात. ) मात्र आधीच आपली आर्थिक परिस्थिती पाहून खर्च केल्यास कर्ज काढण्याची वेळ येत नाही. त्यामुळे कर्ज काढूच नका आणि काढले तर जीवन संपवू नका. कारण कालांतराने परिस्थिती बदलू शकते. आजकाल तरूणपिढी तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी गेली आहे. तरूणांनो व्यसने सोडून द्या आणि चांगले जीवन जगा असा हितोपदेश सप्तखंजेरी वादक संदीपपाल महाराज यांनी प्रबोधन करताना उपस्थितांना केला. भवानी क्रीडा मंडळ व समस्त गावकरी मंडळी पणज यांच्या वतीने संत तुकाराम महाराज बीज उत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संदीपपाल महाराज प्रबोधन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मधुकरराव कोल्हे होते, तर प्रमुख उपस्थिती राजीव बोचे माजी जि.प. सभापती,रामप्रभू तराळे,दिनकरराव बोचे, पवनपाल महाराज,संजय देशमुख,जावोद्दीन भाई उपसरपंच, रतनलाल तायडे, विनोद जायले, एकनाथराव बोचे,रामदास अघडते, सुभाषराव मांडवे, अमोल बदरखे, पंकज ढेंबरे,पत्रकार राहुल कुलट, मंगेश निंबोळकार,हिमायत हुसेन, मुन्ना मास्टर, मुकुंदराव आकोटकर, गुलाबराव शेंडे,नितीन महाले, प्रमोद शेंडे, संजय अस्वार, पत्रकार दिनेश बोचे, संजय गवळी यांची होती. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी केले. मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.पत्रकारीते बरोबर आपल्या मित्र परीवारांच्या सहकार्याने सामाजिक कार्य करणारे पत्रकार संजय गवळी व दिनेश बोचे यांचा संदिपपाल महाराज यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन अनिल रोकडे तर आभार प्रदर्शन दिनेश बोचे यांनी केले.