• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जलजागृती सप्ताह; पाण्याच्या वापराबाबत जनसामान्यात जनजागृती करा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Our Media by Our Media
March 17, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
84 1
0
JAL JAGRUTI DIN UGHATAN 16-3-22
51
SHARES
607
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.17: पाण्याचा वापर योग्य व काटकसरीने करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. वातावरण बदल व अनिश्चित पर्जन्यमानामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक असून पाण्याच्या पुर्नवापराबाबत प्रशासन, सामाजिक व शैक्षणिक संस्थानी शालेय विद्यार्थ्यांसह  जनसामान्यापर्यंत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जलजागृती सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रम दरम्यान त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निवासी  उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोला सिंचन मडळाचे अधिक्षक अभियंता सु.गो.राठी, अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.खु.वसुलकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. चव्हाण, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, अकोला सिंचन मंडळचे उपअधिक्षक अभियंता शिल्पा आळसी, काटेपुर्णा पाणी वापर संस्थाचे अध्यक्ष दिगांबर गावंडे, प्रकल्पस्तरीयपाणी वापर संस्थाचे अध्यक्ष मनोज तायडे, केशवराज पाणी वापर संस्थाचे अध्यक्ष मुमताज बॉबी देशमुख आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

जल जागृती उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, पाण्याचा वापर योग्य व काटकसरीने होणे आवश्यक असून यांची सुरुवात शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करावी. याकरीता शाळा व महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धेच्या माध्यमातून पाण्याचे महत्व रुजवावे. पाण्याचा अपव्यय न करता पाण्याचा जास्तीत जास्त पुर्नवापर करावा. याकरीता स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबवावे. जलजागृती सप्ताह मर्यादित कालावधीतपुरता न राबविता संपुर्ण वर्षभर ही मोहिम राबवावी.  तसेच आगामी काळातील टंचाई लक्षात घेवून सर्व शासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी योवळी दिले.

जलजागृती सप्ताहाची सुरवात दिप प्रज्वलन करुन जिल्ह्यातील काटेपुर्णा, पुर्णा, वान, निर्गुणा, उमा व मोर्णा या नद्यांच्या जलाव्दारे कलश पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थिताना जलप्रतिज्ञेचे वाचन करुन प्रतिज्ञा देण्यात आली.  या सप्ताहमध्ये ग्रामीण भागात जल जागृती व्हावी याकरीता कार्यक्रम राबविण्यात येणार असून शासनाच्या योजनाची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. कार्यक्रमाची प्रास्ताविक अकोला सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता सु.गो. राठी यांनी तर आभार प्रदर्शन सौ आळशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अश्विनी देशमुख यांनी केले.

जिल्ह्यात चित्ररथाव्दारे जलजागृती

पाटबंधारे विभागाच्यावतीने जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये पाण्याचे महत्व व वापर याबाबत माहिती व्हावी याकरीता शहरी व ग्रामीण भागाच्या महत्वाच्या ठिकाणी चित्ररथाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

Tags: Collector Nima Arora
Previous Post

जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती सभा; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Next Post

Holi 2022: “तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”; भाजपचा एल्गार

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
UDDHAV-SAJEB

Holi 2022: "तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच"; भाजपचा एल्गार

आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहानुर येथे कोव्हीड लसीकरण प्रतिसाद

आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहानुर येथे कोव्हीड लसीकरण प्रतिसाद

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.