तेल्हारा- नुकत्याच झालेल्या अकोला जिल्यातील सर्व पोलीस स्टेशन च्या गुणात्मक मूल्याकनात तेल्हारा पोलीस स्टेशन हे प्रथम आले आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षाच्या तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये आनंद वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून तेल्हारा पोलीस स्टेशन च्या कर्तव्यदक्ष कारकीर्द पोकळी या मूल्याकनाने भरली आहे.
मुळातच काही महिन्यांपूर्वी च रुजू झालेले ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी विविध मोठ्या प्रकारच्या कार्यवाही व अवैध धंद्यांना लगाम लावण्यात यश मिळवले आहे त्यामुळे जिल्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील कार्याचा आढाव्या मध्ये तेल्हारा शहराचे क्राईम व कायदा सुव्यवस्था आबाधित रहाण्यासाठी तेल्हारा पोलीस स्टेशन हे प्रथम आले आहे. त्यामुळे याबाबत ठाणेदार ज्ञानोबा फड यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी हे श्रेय एकटे माझे नसून माझे सर्व सहकारी अधिकारी पूर्ण पोलीस टीमचे व शहरातील नागरिकांचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.