अकोला: सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त दिनांक १०/ मार्च /२०२२.वार गुरुवार ला सकाळी 11 वाजता विविध कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान, प्रहार संघटना, निर्भय बनो जनांदोलन, यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल चा हॉलमध्ये मध्ये तेल्हारा येथे करण्यात आली आहे.
या कार्यशाळेमध्ये ग्रामसभा ,पंचायत राज ,माहितीचा अधिकार, दारूबंदीचा कायदा, बदली संबंध कायदा ,सेवा अधिनियम , ग्राहक संरक्षण कायदा, दप्तर दिरंगाईचा कायदा, रेशन विषयक कायदा, शेतकरी कायदे, महिलांविषयक कायदे, ज्येष्ठ नागरिकांनी विषयी कायदे, आदी विविध कायद्याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शक तथा निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक, ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे हे करणार आहेत. तरी या कायदेविषयक कार्यशाळेला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत चे सदस्य, ग्रामीण पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी आदि सह जागरूक नागरिक, महिला तरुण युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
कार्यशाळेमध्ये विविध कायद्याविषयी संपूर्ण माहिती या कार्यशाळेमध्ये देण्यात येणार आहे. हे संपुर्ण कायदे आपल्याला शिकवण्यात येणार आहेत. करिता आपली उपस्थिती या कार्यशाळेला आवश्यक आहे. तरी आपण या कार्यशाळा उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती राजेश खारोडे, अध्यक्ष छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान, तथा जिल्हा महासचिव प्रहार व सदस्य ,जिल्हा नियोजन समिती अकोला यांनी पत्रकाद्वारे केली आहे.