• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

यवतमाळ हादरले! दगडाने ठेचून प्रेयसीचा खून, प्रियकराने ब्लेडने स्वत:चाही गळा चिरला

City Reporter by City Reporter
March 4, 2022
in Featured, गुन्हा, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
128 2
0
crime murder
30
SHARES
927
VIEWS
FBWhatsappTelegram

संशयाचे भुत शिरलेल्या प्रियकराने प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केला. स्वतःच्या हाताची नस आणि गळा ब्लेडने कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. ही थरारक घटना गुरुवारी दुपारी लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एमआयडीसीलगत असलेल्या जंगलात उघडकीस आली.

आस्था सुरेश तुंबडे (१८) रा. गुरुकृपा सोसायटी जुना उमरसरा असे मृत मुलीचे नाव आहे, तर शुभम अशोक बकाल (२३) रा. शिंदेनगर असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

शुभम हा वडिलाच्या दुचाकीने लोहारा एमआयडीसी परिसरात पोहोचला. त्याने सोबत आस्थाला घेतले. या झुडपी वजा जंगलात दोघांमध्ये नेमका कशावरुन वाद झाला, हे स्पष्ट नाही. या वादात संतापलेल्या शुभमने आपल्याच प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केला. त्याने अतिशय निर्दयीपणे आस्थाच्या चेहऱ्यावर दगडाने घाव घातले. ती ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर शुभमने ब्लेडने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापली.

नंतर स्वत:चा गळा ब्लेडने चिरला. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत शुभम झुडूपी वजा जंगलातून मुख्य रस्त्यावर आला. तेथे तो योगेश यादव नामक व्यक्तीला दिसला. योगेशने तत्काळ याची माहिती लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांना दिली. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी शुभमला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविले. तर आस्था ही जागेवरच गतप्राण झाल्याचे आढळून आले.

सुरुवातीला प्रेमीयुगुलावर कुणी हल्ला तर केला नाही ना? अशी शंका व्यक्त होत होती. मात्र परिसरातच आरोपी शुभमची दुचाकी आढळून आली. शिवाय आस्थाच्या जवळ तिच्या शाळेची बॅग व इतर कागदपत्रही त्यात आढळून आले. यावरून दोघांची काही तासातच ओळख पटली. त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणी आस्थाचे वडील सुरेश तुंबडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शुभम विरोधात कलम ३०२, ३०९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लोहारा पोलीस ठाण्यात सुरू होती.

Tags: प्रेयसीचा खून
Previous Post

‘विकेल ते पिकेल’: १६५ एकरावर बहरले औषधी गुणधर्माचे ‘जवस’

Next Post

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील न्युक्लियर पावर प्लांटला आग, रेडिएशन लीक होण्याची भिती

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Nagpur

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील न्युक्लियर पावर प्लांटला आग, रेडिएशन लीक होण्याची भिती

"श्री शिवाजी महाविद्यालय अकोट च्या खेळाडूंचे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश"

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.