तेल्हारा: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित आकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा च्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मराठी वृत्तपत्र सुष्टीचेजनक आध पत्रकार कै बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात येवुन उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन केले.
तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे, यांच्या अध्यक्षतेखाली तेल्हारा येथील पत्रकार अनंत अहेरकर यांच्या निवासस्थानी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी कै बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रल्हादराव ठोकणे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन दीपप्रज्वलन व हारार्पन करण्यात आले. पत्रकार सर्वश्री सुरेश शिंगणारे, बाळासाहेब सावरकर, अनंत अहेरकर, रामाभाऊ फाटकर, प्रा. कृण्णा फंदाट, अनिल अवताडे, अनिल जोशी, निलेश जवकार, धमैश चौधरी, विघाधर खुमकर, प्रशांत विखे, सदानंद खारोडे, सुरेश सिसोदिया, अमित काकड, रवि शर्मा, विशाल नांदोकार, राहुल मिटकरी यांनी कै बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. असे अखिल मराठी भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश जवकार यांनी कळविले.