अकोला, दि.२1:- आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकशाही सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी व नगरसेवक सिद्धार्थ शर्मा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा माहिती कार्यालयातील गजानन इंगोले, चंद्रकांत पाटील, हबीब शेख, सुनिल टोमे आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.