अकोला, दि.१८ राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १२ जिल्ह्यांमध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश आहे. यासंदर्भात पडताळणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद तसेच राष्ट्रीय क्षयरोग अनुसंधान केंद्र नवी दिल्ली या संस्थांकडून येणारे पथक हे सर्व्हेक्षण करणार आहे. त्यासाठी आठ चमू गठीत करण्यात आले आहेत.
सर्व्हेक्षण होणारी ठिकाणे या प्रमाणेः-
अकोट- वार्ड क्रमांक सहा, बाळापूर- पारस, बार्शी टाकळी- धामणदरी, अकोला- म्हातोडी व बोरगाव मंजू, मुर्तिजापूर- वार्ड क्रमांक तीन, पातुर- पिंपळखुटा, तेल्हारा- अडगाव बु.
या सर्व ठिकाणी सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या पथकांतील सदस्यांना नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.