अकोला (पंकज इंगळे) -: अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपूल येथील मुख्य चौकात युवा स्वाभिमान पार्टी च्या वतीने मार्गदर्शिका खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचे अनावरण राजमाता जिजाऊ ह्यांच्या जयंतीचे औचित्य साधून १२ जानेवारी २०२२ रोजी अनावरण करण्यात आले होते. परंतु प्रशासनाकडून छत्रपाती शिवाजी महाराजांची पुतळा हटविण्यात आला होता.
त्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले होते. परंतु युवा स्वाभिमान पार्टी चे संस्थापक अध्यक्ष आमदार रवि राणा ह्यांनी पुतळा बसविन्याकरिता लढा दिला. व त्यांच्या लढ्याला यश आले, असून छत्रपती शिवाजी महाराज शिवप्रेमी युवा स्वाभिमान पार्टीचे अकोला जिल्हाध्यक्ष सागर खंडारे ह्यांनी पुन्हा राजापेठ चौकात पुतळा बसविण्याची परवानगी मिळाल्याचा आनंद अकोला शहरातील मुख्य मदनलाल धिंग्रा चौकात उत्साह लाडू वाटप करून साजरा केला. ह्यावेळी जिल्हाध्यक्ष सागर खंडारे, महानगर अध्यक्ष सुमित पाखरे, विशाल वाघ, अक्षय सपकाळ, पंकज इंगळे, रुपेश दामोदर, सुमेध सरदार, आकाश भोलवांडकर, विजय सावळे आदीसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.