दानापूर (सुनीलकुमार धुरडे): येथिल उत्तरेकडील असलेल्या गरुड धाम समशान भूमीत शिवजीच्या लिंग (पिंडीची) व मंदिराचा कळस बसवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. वाण नदीच्या तीरावर वसलेल्या व वय वर्ष 75 वर्षा वरील ज्येष्ठांनी लोकसहभागातून तयार केलेल्या या गरुड धाम मध्ये वारी हनुमान मंदिराचे महंत श्री. कृष्णादंजी भारती महाराज यांच्या हस्ते महादेवाची लिंग व मंदिराच्या कळस बसवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम शिवजीच्या लिंगाची व कळसाची गावातून वाजत गाजत पारंपरिक ढोलच्या भजनाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर लिंग कळसाला जलाभिषेक, धान्यअभिषेख, फुल अभिषेक करण्यात आला. 2 दिवस यझ विधीचा कार्यक्रम करून वार सोमवरला सोम प्रदोष या शुभ मुहूर्तावर लिंग स्थापना व कळस बसवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यानंतर गरुड धाम येथे वारी हनुमान मंदिराचे महंत श्री. कृष्णादंजी भारती महाराज यांच्या प्रवचन करून पुलवाम येथे शहीद झालेल्या विर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून महाप्रसादला प्रारंभ झाला. यावेळी गरुड धाम मध्ये झालेल्याविकास कामाचा आढावा यावेळी लोकांना देण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला गरुड धाम सेवा समितीचे सर्व सदस्य, कागभुसंडी स्मशानभूमीचे सर्व सदस्य सरपंच सौ. सपना धम्मपाल वाकोडे, तलाठी अंकुश मानकर, अभियंता गजानन तायडे, ग्रामपंचायत सदस्य, गावातीलभाविक सोबतच दानापूर परिसरातील भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकृष्ण भगत तर आभार सुनिलकुमार धुरडे यांनी मानले.
महिलांची विशेष उपस्थिती
स्मशानभूमी म्हटली की महिलांना त्या ठिकाणी न जाण्याची ग्रामीण भागात पद्धत आहे. मात्र दानापूर येथील एकमेव स्मशानभूमी (गरुड धाम) आज ओळखले जाते ज्या स्मशानभूमीत (गरुड धाम) यांमध्ये महिला ह्या दर आठवड्याला साफसफाई, भजन, पूजा अर्चा तर करतातच मात्र या संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांची विशेष उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.
चक्क स्मशानभूमीत झाला महाप्रसादाचा कार्यक्रम
स्मशानभूमी म्हटलं की मनुष्याची शेवटची जागा म्हणजे स्मशानभूमी या ठिकाणी पडक शेड, त्यामध्ये असलेली त्या प्रेताची जागा सरण रचून त्यावर तिथे प्रेताला ठेवायचं आणि अग्नी देऊन दहा मिनिट श्रद्धांजली अर्पण करून तिथून निघून यायचं एवढेच कार्य या मशानभुमी भूमीमध्ये केले जाते. मात्र तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील ही स्मशानभूमी (गरुड धाम) या सर्व गोष्टींना अपवाद ठरत आहे. या ठिकाणी चक्क महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे परिसरात सह दानापूर गावच्या स्मशानभूमीची जोरदार चर्चा रंगली आहे. बहुदा हा अकोला जिल्ह्यातील असणारा आगळावेगळा पहिला प्रयोग असावा असे बोलले जात आहे.
दानापूर येथील स्मशानभूमी गरुड धाम यापुढे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणार
ज्येष्ठांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षापासून अविरत कार्य सुरू असणाऱ्या या स्मशान भूमीमध्ये 290 प्रकारच्या विविध झाडांची सोबतच फुल झाडांची लागवड करण्यात आली या ठिकाणी विसावा ओटा, महाकाय शिवजींची मूर्ती, लिंग, व मंदिर बांधण्यात आल्यामुळे या स्मशानभूमी ला आता तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. सर्व सुविधांनी नटलेल्या व वाणनदीच्या तीरावर वसलेल्या या स्मशानभूमीत (गरुड धाम) मध्ये महिला पुरुष रोज दर्शनासाठी येतात हे विशेष.