अकोला: अकोला जिल्ह्यातील देवरी फाटा ते शेगाव रस्त्यावरील ग्राम रौदळा गावाजवळ काही मिटर रस्त्याचे काम अपूर्ण असून अनेक सदर रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे यासाठी प्रहरचे प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची मंत्रालयात भेट घेतली.
काल दिनांक १० जानेवारी रोजी परतवाडा येथील चार जण शेगाव कडे जात होते मात्र रौदळा गावानजीक अपूर्ण असलेल्या रस्त्यावर वाचकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार झाडावर आदळून चोघे जण जागीच ठार झाले याबाबत प्रहारचे प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांनी आज मंत्रालयात याबाबत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री भरणे यांना याबाबत माहिती देऊन सदर जीवघेणा रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सादर केले.
सदर अपघात ठिकाणी याआधी सुद्धा झाले अपघात
सदर अपघात जिथे झाला त्या ठिकाणी वाहन चालकाला रस्ताच दिसत नाही कारण देवरी येथून निघाल्यानंतर कुठलेही वाहन सिमेंट रस्ता असल्याने भरधाव वेगाने असते मात्र मधेच रौदळा नजीक काही मिटर वन विभागाच्या आडकाठी मुळे रस्त्याचे काम बाकी आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अनेकाना आपला जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले आहे तर नेहमीच अनेक वाहनाचे येथे नुकसान होत आहे.तरी त्वरित रस्ता दुरिस्ति करण्यात यावी अशी मागणी होत आहे.