• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 21, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home आंतराष्ट्रीय

चक्क माणसाच्या छातीत धडधडले डुकराचे हृदय; अमेरिकेत जगातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

Our Media by Our Media
January 11, 2022
in आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
139 1
0
चक्क माणसाच्या छातीत धडधडले डुकराचे हृदय; अमेरिकेत जगातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी
20
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

मेरीलँड (अमेरिका) :  अमेरिकेतील एका ५७ वर्षीय व्यक्तीला चक्क डुकराचे हृदय बसवण्यात आले आहे. एका मानवाच्या शरिरात डुकराचे हृदय प्रत्यारोपण करण्याची जगातील ही पहिल्या शस्त्रक्रिया (First heart transplant) आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी सदर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे सदर व्यक्तीच्या छातीत गेली तीन दिवस डुकराचे हृदय धडधडत आहे. अमेरिकेतील यूनिवर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरमध्ये (University of Maryland Medical Center) ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

एका वृत्तानुसार, ज्या रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली त्याचे नाव डेव्ह बेनेट (Dave Bennett, 57) असे आहे. ते हृदयरोगाने त्रस्त होते. त्यांची वैद्यकीय स्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांना पारंपरिक हृदय प्रत्यारोपण अथवा कृत्रिम हृदय पंप बसविणे शक्य नव्हते. त्यांच्या शरिरात डुकराचे हृदय बसविण्याचा एकमेव पर्याय उरला होता. त्यासाठी पहिली प्रायोगिक तत्त्वावर शस्त्रक्रिया करण्यास त्यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर डॉक्टरांनी जनुकीय उत्परिवर्तन डुकराचे हृदय (gene-edited pig) रोपण करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया तब्बल ९ तास चालली. डॉक्टरांनी त्यांच्या शरिरात १ वर्षाच्या २४० पाऊंड वजन असलेल्या डुकराचे हृदय बसवले. यामुळे आता बेनेट व्हेंटिलेटरशिवाय स्वत: श्वास घेत आहे. मला जगायचे आहे, असे डेव्ह बेनेट यांनी शस्त्रक्रियेपूर्वी म्हटले होते. आणि तसेच त्यांच्याबाबतीत घडले आहे. डेव्ह बेनेट यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी यूएस फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने ३१ डिसेंबर रोजी परवानगी दिली होती.

हेही वाचा

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

“हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. माझ्या वडिलांना याचीच गरज होती आणि आम्हाला जे हवे होते तेच मिळाल्यासारखे वाटते.” अशी प्रतिक्रिया बेनेट यांचा मुलगा डेव्हिड यांनी दिली आहे.

दरवर्षी लाखो लोकांना अवयव प्रत्यारोपणाची गरज…

प्राण्यांच्या अवयवांचा वापर करुन मानवी जीवन कसे वाचवायचे हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक दशके संशोधन करत आहेत. दरवर्षी लाखो लोक अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करत असतात. दाता मिळत नसल्याने त्यांना अनेक दिवस वेदना सोसाव्या लागतात. यामुळे अनेकांचा मृत्यूही होतो. डुकरांना माणसांसारखे अवयव असतात. जर ते अवयव प्रत्यारोपणात वापरता आले तर अनेक रुग्णांची प्रतीक्षा संपणार आहे.

Tags: pigheartUniversity of Maryland Medical Center
Previous Post

राशनच्या तांदुळाचा काळाबाजार, 19 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, विशेष पथकाची कारवाई

Next Post

अकोट ते शेगाव महामार्गावरील रौदळा गावाजवळील त्या जीवघेण्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अनिल गावंडे यांची सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांच्याकडे मागणी

RelatedPosts

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर
Featured

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

December 13, 2024
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग
Featured

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

June 8, 2024
T20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा सराव सुरू
Featured

T20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा सराव सुरू

May 29, 2024
हा आहे सर्वात महागडा आंबा..!
Featured

हा आहे सर्वात महागडा आंबा..!

May 16, 2024
Covishield-vaccine
Featured

अ‍ॅस्ट्राझेनेका लस जगभरातून परत मागवली कोव्हिशिल्ड बनवणाऱ्या कंपनीचा मोठा निर्णय

May 8, 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान
Featured

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान

March 12, 2024
Next Post
अकोट ते शेगाव महामार्गावरील रौदळा गावाजवळील त्या जीवघेण्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अनिल गावंडे यांची सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांच्याकडे मागणी

अकोट ते शेगाव महामार्गावरील रौदळा गावाजवळील त्या जीवघेण्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अनिल गावंडे यांची सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांच्याकडे मागणी

देवरी शेगांव मार्गावर, पाटसूल नजीक भीषण अपघात ४ जणांच्या मृत्युप्रकरणी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !

देवरी शेगांव मार्गावर, पाटसूल नजीक भीषण अपघात ४ जणांच्या मृत्युप्रकरणी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.