अकोट(देवानंद खिरकर) – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ढगाफाटा येथील क वर्ग तिर्थक्षेत्र कैलास बाबा मंदिरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे फोटो चे पूजन हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रु.ऊ.बा.स चे मुख्य प्रशासक तथा जि. प. सदस्य गजानन पुंडकर होते. प्रमुख पाहुणे राज्य अध्यक्ष गजानन वाघमारे राज्य सचिव राजेश डोंगटे, राज्य उपाध्यक्ष शैलश अलोने, राज्य सचिव अविनाश राठोड होते. सर्व मान्यवरांनी पत्रकार दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त करत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उपवीभागीय अधीकारी श्रीकांत देशपांडे यांनी समाज हितासाठी नेहमी सिंहाचा वाटा असलेले जागृत क्षेत्र म्हणजे पत्रकारितेचा हीच खरी होय असे संबोधित केले, पोलीस कान्टेबल हींमत दंदी यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित पत्रकारांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दूरदर्शन वाहिनी चे अकोला प्रतिनिधी तथा कृ ऊ.बा. समितीचे संचालक विशाल बोरे तथा ज्येष्ठ पत्रकार रामदास काळे यांची होती.
पत्रकार दिनानिमीत्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नविन सदस्य नरेश पुनकर यांना.सदस्यपदी नियुक्ती देण्यात आली. पत्रकार विशालराजे बोरे यांना वाढदीवसानीमीत्त पत्रकार संघाचे वतीन शुभेच्छा देण्यात आले।कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अहेमद शेख जिल्हाउपाध्यक्ष कमलेश राठी, निरंजन गावंडे,तालुका अध्यक्ष विठ्ठलराव गुजरकर,सल्लागार गोवर्धन चव्हाण, कार्याध्यक्ष अरुण काकाड, सचिन पवन बेलसरे तालुका उपाध्यक्ष गणेश वाकोडे कार्यालय प्रतिनिधी काशिनाथ कोंडे, माजी उपसभापती पं.स. तथा उपाध्यक्ष ग्रा.प.संघ निलेश झाडे, साधुबुवा खोटरे, तूषार अढाऊ, नरेंद्र कोंडे, विठ्ठल येवोकार, बाळकृष्ण तळी, जगदीश जेस्वाणी,राजेश सावीकार, शैलेश धांडे, राजकुमार मुडाले, शीरीष महाले, दत्ता भगत, शरद वालशिंगे भेंडे, स्वप्नील ईंगले, प्रमोद ढोकणे, पुरूषोत्तम निमकर्डे यांच्यासह ग्रामीण पत्रकार उपस्थित होते .भारत बंगाले, शिवशंकर सोनोने, प्रशांत गुजरकर, भरत सोनोने, व्रुत्तपत्र वीक्रेता संघाचे. नितीन खांडेकर, गणेश अवचार यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन गांवडे, प्रास्ताविक विठ्ठलराव गुजरकर तर आभारप्रदर्शन नरेंद्र कोंडे यांनी केले.