• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 18, 2022
36 °c
Akola
36 ° Sat
36 ° Sun
36 ° Mon
35 ° Tue
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

जळगाव, पुण्यात मराठा विद्याप्रसारक संस्थेशी संबंधित गुन्ह्यात छापेमारी

Our Media by Our Media
January 10, 2022
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
0
crime
13
SHARES
651
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेशी संबंधित माजी मंत्री गिरीश महाजन संशयित आरोपी असलेल्या पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली. जळगाव व पुण्यात एकाचवेळी पाच प्रमुख आरोपींच्या घर व कार्यालयावर ही छापेमारी केली आहे. येथून महत्वाची कागदपत्रे हाती लागली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. ४० जणांच्या पथकाने ही छापेमारी केली आहे.

ॲड. विजय पाटील (वय ५२) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात जानेवारी २०२१ मध्ये फिर्याद दिली होती. त्यावरुन गिरीश दत्तात्रेय महाजन (रा. जामनेर, जळगाव), तानाजी भोईटे (रा. कोंढवा), नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे (रा. भोईटेनगर जळगाव) यांच्यासह 29 जणांविरुद्ध भादवी कलम १२० (ब), ३३१, ३८४, ३७९, ४४७, ४४८, ४४९, ४५४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ५०४, ५०६ (२), ५११, १०९, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा

महिला पोलिसाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, बीएसएफ जवानाला अटक

देशभरात एप्रिलमध्ये 88 लाख नोकर्‍या; रोजगार निर्मिती कमीच

तक्रारदार अॅड. विजय पाटील यांना आरोपींनी कट व संगनमत करून संस्थेची कागदपत्रे ताब्यात देतो, असे म्हणून पुण्यात बोलाविले. त्यानंतर त्यांना दमदाटी व शिवीगाळकरून संस्था ताब्यात देण्याकरिता दबाव आणला. त्यांना एक कोटी घेऊन संस्था ताब्यात देण्यास सांगितले होते. संस्था ताब्यात न दिल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देखील दिली होती. त्यांना व साक्षीदारांना स्कोडा गाडीत डांबून पुण्यातील फ्लॅटवर जबरदस्तीने नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करून त्यांच्या पोटाला चाकू लावला. तसेच, त्यांचे कपडे काढून त्यांना डांबून ठेवले.

संस्थेच्या सर्व संचालकांचे राजीनामे आणून न दिल्यास व संस्था ताब्यात न दिल्यास एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली होती. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून खंडणी स्वरूपात ५ लाख रुपये घेतले. त्यानंतर संस्थेत बेकायदेशीर प्रवेश करून कागदपत्रे नेली असल्याचा गुन्हा दाखल आहे.

हा गुन्हा प्रथम जळगाव जिल्ह्यातील भिंगोरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. परंतु, गुन्हा पुण्यात घडल्याने तो पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग केला गेला होता. या गुन्ह्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्यानंतर या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. परंतु, अद्याप अटक कोणाला करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादीमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याही नावाचा उल्लेख होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी संबंधित प्रकरणामध्ये महाजन यांची नेमकी भूमिका काय आहे, याचा तपासणार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. दोन दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी संबंधित प्रकरणात “मोक्का’अंतर्गत कारवाईबाबतचा उल्लेख केला होता.

संबंधित प्रकरण कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल असल्याने महिला सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालील ३० जणांचे एक पथक रविवारी सकाळी जळगावमध्ये दाखल झाले होते. संबंधित पथकाने संबंधीत गुन्ह्यातील संशयित आरोपी व महाजन यांचे निकटवर्तीय असणाऱ्या पाच जणांच्या घरी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली होती. रविवारी रात्री उशीरापर्यंत झाडाझडती सुरु होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाजन यांची चौकशी झाली नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

Tags: Crimejalgaonmaratha vidya prasark sansthaPuneraid
Previous Post

समाज हिताचे भान ठेवणारे जागृत क्षेत्र म्हणजे पत्रकारिता- उपवीभागीय अधीकारी मा. श्रीकांत देशपांडे

Next Post

किड्स पॅराडाईज येथे उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार

RelatedPosts

facebook-2
Featured

महिला पोलिसाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, बीएसएफ जवानाला अटक

May 17, 2022
नोकर्‍या;
Featured

देशभरात एप्रिलमध्ये 88 लाख नोकर्‍या; रोजगार निर्मिती कमीच

May 17, 2022
fdfffsfsfsfs
Featured

शालेय पोषण आहारात मधाचा समावेश करणार : सुभाष देसाई

May 17, 2022
rain-2 (1)
Featured

मान्सून आज अंदमानात दाखल; दक्षिण भारतात अतिवृष्टी

May 16, 2022
akola news
Featured

नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाचा दौरा जाहीर

May 14, 2022
ramayana-yatra
Featured

18 दिवसांची ‘रामायण यात्रा’ 21 जूनपासून

May 13, 2022
Next Post
किड्स पॅराडाईज येथे उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार

किड्स पॅराडाईज येथे उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार

अखेर हिवरखेड – अकोट मार्गावरील खड्डे बुजविले आणि गतिरोधक लावले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्त्यांच्या आढावा बैठकीत गाजला होता विषय

अखेर हिवरखेड - अकोट मार्गावरील खड्डे बुजविले आणि गतिरोधक लावले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्त्यांच्या आढावा बैठकीत गाजला होता विषय

Stay Connected

  • 319 Followers
  • 284 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

मान्सुनपूर्व तयारी आढावा : समन्वय, संपर्क आणि सतर्कतेने काम करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

मान्सुनपूर्व तयारी आढावा : समन्वय, संपर्क आणि सतर्कतेने काम करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

May 13, 2022
shri (1)

श्रीराम पचिंद्रे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार

May 18, 2022
bachhu kadu

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार राबविलेले विशेष अभियान; शिधापत्रिकांसंदर्भात 27 हजारांहून अधिक तक्रारींचा निपटारा

May 17, 2022
प्र्शिक्षण

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण

May 11, 2022
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks