अकोला दि.5: प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत असंघटीत अन्न प्रक्रिया उद्योगातील वैद्यक्टिक सुक्ष्म उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, उत्पादक सहकारी संस्थांच्या उत्पादनासाठी सर्वंकष उद्योग विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य करणे या उद्देशाने सोमवार दि. ३ पासून कर्ज मंजूरी पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी दि.१८ पर्यंत अकोला जिल्ह्यात हरभरा या पिकासाठी प्रक्रिया उद्योगांना बॅंक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किमतीच्या ३५ टक्क्यांपर्यंत व जास्तीत जास्त १० लाख रुपये मर्यादे पर्यंत प्रति प्रकल्पासाठी अनुदान देय असेल.
या योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शक सुचना तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://pmfme.mofpi.gov.in व http://pmfme.mofpi.gov.in/mis/#login या संकेतस्थळावर जावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.