• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू; पीएम मोदींकडून शोक व्यक्त

Our Media by Our Media
January 1, 2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
111 1
0
माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू; पीएम मोदींकडून शोक व्यक्त
16
SHARES
802
VIEWS
FBWhatsappTelegram

जम्मू :  जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून १४ यात्रेकरू जखमी झाले आहेत. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्रिकुटा टेकडीवर असलेल्या मंदिराच्या गर्भगृहाबाहेर ही घटना घडली. आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैष्णो देवी भवनात नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली तेव्हा चेंगराचेंगरी झाली.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

चेंगराचेंगरीत १२ यात्रेकरू ठार आणि किमान १४ जण जखमी झाल्याची पुष्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि नित्यानंद राय यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.

पीएम मोदींनी चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. सर्व जखमींवर श्राइन बोर्डाकडून उपचार केले जातील, असेही राज्यपाल कार्यालयाने जाहीर केले आहे.

पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माता वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे उद्भवलेल्या दुःखद परिस्थितीचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करत आहेत.

Tags: Mata Vaishnodevi templePM Modi
Previous Post

ओमायक्रॉनः सुधारीत निर्बंध जारी

Next Post

तेल्हारा तालुक्यातील खड्यात गेलेल्या रस्त्यांसाठी पुन्हा मिशन आमरण उपोषण सुरू

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Next Post
तेल्हारा तालुक्यातील खड्यात गेलेल्या रस्त्यांसाठी पुन्हा मिशन आमरण उपोषण सुरू

तेल्हारा तालुक्यातील खड्यात गेलेल्या रस्त्यांसाठी पुन्हा मिशन आमरण उपोषण सुरू

uddhav Thakre

नवीन वर्षात मुंबईकरांना मोठी भेट, ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.