अकोला दि.३१: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १० व्या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम शनिवार दि.१ जानेवारी रोजी होणार आहे.
हा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमात सहभागासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डी.डी. किसान, डी. डी. नॅशनल(दूरदर्शन) या वाहिन्यांवर होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट वेबकास्ट pmindiawebcast.nic.in वर उपलब्ध असणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे