नवेगाव (आलेगाव): सुनिल गाडगे: येथील शेतकरी, भुमिअभिलेख, वनविभाग यांनी संगनमताने बनावटी दस्तऐवज बनवून वनातील सागवान झाडे तोडण्यासंबंधित गुन्हेगारांवर गुन्हे नोंदविण्यासाठी गत बुधवार दि. २२.१२.२०२१ पासून श्री खुळे व श्रीवास जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसले.
काल झालेल्या वादळी गारपीट व आठ दिवसाच्या उपोषणाने श्री उत्तम खुळे यांची प्रक्रुती ढासळली असून शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून रक्तामधील शुगर कमी झाल्याने दवाखान्यात भरती करण्याचा सल्ला दिला. उपोषणकर्ता घटनात्मक रित्या न्याय मागत असता वनविभाग सतत टवाळखोरी करत विगत वर्षांपासून दोषींवर कारवाई करण्या ऐवजी वाचवण्यासाठी उपोषणकर्त्याच्या जिवाशी खेळत आहे. उपोषणकर्त्याच्या जिवाचे काही बरे वाईट झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील याची नोंद घेऊन जनतेच्या संयमाशी खेळ करु नये.