अकोला: दि.23 : जिल्ह्यातील अवैध गौणखनिज वाहतुकीप्रकरणी अकोला जिल्ह्यातील मौजा कट्यार व बाळापूर तालुक्यातील बारलिंगा येथील पोलिस पाटील यांना बडतर्फीचे आदेश उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी निगर्मित केले आहे.
जिल्ह्यात सर्रास होणाऱ्या अवैध गौणखनिज वाहतुकी आळा घालण्याचे दृष्टीने मोक्याचे ठिकाणी भरारी प्रथकाचे गठन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व खनिकर्म शाखेकडून वारंवार दिल्या जाणार सुचनांचे पालन न केल्यामुळे अकोला जिल्ह्यातील मौजा कट्यार व बाळापूर तालुक्यातील बारलिंगा येथील पोलिस पाटील यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या. परंतु संबंधिताकडून देण्यात आलेल्या खुलासा तर्कसंगत नसल्याने ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम 9 मधील (इ)(फ) तरतुदीनुसार उपविभागीय अधिकारी यांना असलेल्या अधिकारानुसार अकोला येथील मौजा कट्यार व बाळापूर तालुक्यातील बारलिंगा येथील पोलिस पाटील यांना आपले कर्तव्य पार पाडण्यात दुर्लक्ष, हयगय व गैरवर्तणुकीप्रकरणी पोलिस पाटील पदावरुन बडतर्फ करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अवैध गौणखनिजाची वाहतुक करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर सक्तीचे दंडात्मक कार्यवाही करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित यंत्रणेला दिले.