अकोला दि.24: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्र शासनाव्दारे वसतीगृहाची योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाव्दारे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थेमार्फत भाडेतत्वावर वसतीगृहाचे प्रस्ताव दि. 11 जानेवारी 2022 पर्यंत करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापन समिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.
जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या महिलाकरीता स्वयंसेवी संस्था यांच्या अनुक्रमे 60:15:25 या हिस्याच्या प्रमाणात अटीशीर्तीचे पुर्तता करणाऱ्या संस्थेकडुन पाच प्रतीत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार परिशिष्ट अ व ब मध्ये नमुद करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वाची व कागदपत्राची पुर्तता करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाचे प्रस्ताव स्विकारण्यात येईल. परिशिष्ट अ व ब ची प्रत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन वेळेत दि. 27 ते 31 डिसेंबरपर्यंत वाटप होईल. तर परिपुर्ण असलेले स्वयंसेवी संस्थेचे प्रस्ताव दि. 3 ते 11 जानेवारीपर्यंत स्विकारले जाईल. अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हाधिकारी परिसर अकोला येथे किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9970082472 वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.