• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 29, 2022
34 °c
Akola
35 ° Thu
33 ° Fri
33 ° Sat
33 ° Sun
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home फिचर्ड

सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार

Our Media by Our Media
December 23, 2021
in फिचर्ड
Reading Time: 1 min read
0
सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार
13
SHARES
620
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई, दि. २२ : मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच विविध समाजमाध्यमे देखील महत्त्वाची आहेत. माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी येत्या काळात समाजमाध्यमांचा अधिकाधिक वापर करुन शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे काम करीत अचूकता आणि गतिमानतेवर भर द्यावा, असे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव दीपक कपूर यांनी केले.

श्री. दीपक कपूर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून स्वीकारला. यावेळी संचालक (प्रशासन) श्री. गणेश रामदासी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. कपूर यांचे स्वागत केले तर डॉ. पांढरपट्टे यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्रभारी संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रदर्शने) श्रीमती सीमा रनाळकर, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर यांचेसह विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

मोठी बातमी! राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या सकाळी 11 वा. बहुमत चाचणी

अकोला, बाळापूर तालुक्यात पावसामुळे घरे, रस्ते, पुलाचे नुकसान

पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित बैठकीत श्री. दीपक कपूर म्हणाले की, समाजमाध्यमांमध्ये मोठी ताकद असून विविध जागतिक, राष्ट्रीय घडामोडींमध्ये याचा वापर कसा होतो ते दिसून आले आहे. शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काचे काम करीत असताना सर्व अधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करण्याची गरज आहे. समाजमाध्यमांवरील शासनविषयक किंवा आपल्या विभागाशी संबंधित पोस्ट्सवर तत्काळ प्रतिसाद दिल्यास शासनाच्या सकारात्मक प्रतिमानिर्मितीला त्याचा मोठा लाभ होणार आहे. लोकाभिमुख कल्याणकारी योजना, शासनाचे जनहिताचे निर्णय, घोषणा, उपक्रमांची माहिती तत्काळ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन श्री. दीपक कपूर यांनी यावेळी केले.

शासनाच्या समाजमाध्यमांवरील मजकूर हा प्रसारमाध्यमांसाठी बातमीचा स्त्रोत व्हायला पाहिजे हे सांगताना अचूक, वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहिती देणे हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या बातम्यांचा मूळ गाभा आहे, त्यादृष्टीने कमी वेळेत अधिक गतीने माहितीचे प्रसारण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही श्री. दीपक कपूर यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना मावळते सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दोन वर्षांच्या कालावधीतील कार्याचा आढावा घेतला. इतर सर्व विभागांपेक्षा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्याकामाचा अनुभव आपणासाठी वेगळा होता, असे सांगताना त्यांनी अहोरात्र सजग राहून काम करणाऱ्या या विभागाने कोरोना काळात केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. डॉ. पांढरपट्टे यांची रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागात मृद व जलसंधारण सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

श्री. दीपक कपूर यांच्याविषयी…

भारतीय प्रशासन सेवेच्या १९९१ च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले श्री. दीपक कपूर हे सध्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे महासंचालक तथा सचिव (माहिती व जनसंपर्क) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

श्री. कपूर यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदांवर काम केले आहे.

अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या विभागाचे सचिव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर श्री. दीपक कपूर यांनी उल्लेखनीय सेवा केली आहे.

Tags: Chartered OfficerDeepak Kapoor
Previous Post

सातारा : मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

Next Post

येत्या २९ जानेवारीला पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा, ६ जानेवारीला पत्रकार दिन जिल्हाभर साजरा होणार

RelatedPosts

‘त्या’ तीन घटना, ठाकरे सरकार राज्यपालांची थेट राष्ट्रपतींकडे तक्रार करु शकतं, कायदे तज्ज्ञांचा दावा
Featured

मोठी बातमी! राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या सकाळी 11 वा. बहुमत चाचणी

June 29, 2022
Rain
Featured

अकोला, बाळापूर तालुक्यात पावसामुळे घरे, रस्ते, पुलाचे नुकसान

June 29, 2022
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवनचरित्र चित्रप्रदर्शन: विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय करुन देणारा उत्कृष्ट उपक्रम-आ.अमोल मिटकरी: निबंध स्पर्धा; विजेत्यांना घडविणार कोल्हापूर सहल

June 28, 2022
Eknath Shinde
Featured

बंडखोर मंत्री, आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; राज्यात परतण्याचे आदेश देण्याची मागणी

June 28, 2022
Sakhi One Stop Center
Featured

‘सखी वन स्टॉप सेंटर’ बाबत जनजागृती

June 28, 2022
पातुरात वीज कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
Featured

विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

June 28, 2022
Next Post
येत्या २९ जानेवारीला पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा, ६ जानेवारीला पत्रकार दिन जिल्हाभर साजरा होणार

येत्या २९ जानेवारीला पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा, ६ जानेवारीला पत्रकार दिन जिल्हाभर साजरा होणार

akola news

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी स्वयंसेवी संस्थेकडुन भाडेतत्वावर वसतीगृहाचे प्रस्ताव मागविले

Stay Connected

  • 329 Followers
  • 283 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

Mumbai Attack

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद मीरला (Sajid Mir) पकडले; पाक ने केला होता मेल्याचा दावा

June 25, 2022
सामाजिक न्याय विभागाचे विशेष चित्रप्रदर्शन: 148 छायाचित्रांतून उलगडणार राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा पट

सामाजिक न्याय विभागाचे विशेष चित्रप्रदर्शन: 148 छायाचित्रांतून उलगडणार राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा पट

June 27, 2022
पातुरात वीज कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

June 28, 2022
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवनचरित्र चित्रप्रदर्शन: विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय करुन देणारा उत्कृष्ट उपक्रम-आ.अमोल मिटकरी: निबंध स्पर्धा; विजेत्यांना घडविणार कोल्हापूर सहल

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवनचरित्र चित्रप्रदर्शन: विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय करुन देणारा उत्कृष्ट उपक्रम-आ.अमोल मिटकरी: निबंध स्पर्धा; विजेत्यांना घडविणार कोल्हापूर सहल

June 28, 2022
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks