अकोला : महाराष्ट्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते व स्वातंत्र सैनिक कॉ. मनोहर टाकसाळ यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी काल त्यांचे दि. ३०.११.२०२१ निधन झाले. कम्युनिस्ट पक्ष व चळवळ पोरकी करुण निघून गेलेत ते कामगार कष्टकरी चळवळीचे धग धगती मशाल होते.! त्यांचे भारतीय स्वातंत्र मोठे योगदान होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ७० वर्षे पक्षकार्यत कम्युनिस्ट चळवळीला प्रेरणा देत राहील.! काल संध्याकाळ पासुनच त्यांना अभिवादन करण्या करिता पक्षा व जनसंघटनेचा झंडा अर्ध्यावर करुण ठेवला होता आज त्यांची अभिवादन सभा अकोला भारतीय कम्युनिस्ट पक्षावतीने कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांना भाकपा व आयटक अकोला जिल्हाने अभिवादन केले.! कॉ. रमेश गायकवाड यांनी कॉ. मनोहर टाकसाळ यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुण उपस्थितांनी पुष्प अर्पण केले नंतर कॉ. रमेश गायकवाड यांनी कॉ. मनोहर टाकसाळ यांच्या जीवनावर प्रकाश टाकत म्हणाले की, कॉ. मनोहर टाकसाळ यांचा जन्म राजुरा जिल्हा बीड येथे १९२९ साली झाला. ते निर्व्यसनी, संपूर्ण सत्यवादी, जीवन जगले उच्च शिक्षण घेवुन ते वकील झाले. ते विद्यार्थी दशेत स्वातंत्र्य चळवळ कडे ओढले गेले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले.!
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या झंडया खाली भारताला स्वातंत्र मिळवून दिले अनेक कामगार कष्टकरी वर्गाला न्याय मिळवुन दिला आहे.!
कॉ. मनोहर टाकसाळ हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनेक वर्षे सचिव मंडळ सदस्य होते, राष्ट्रिय कार्यकारिणीचे चे सदस्य व तीन वर्षे राज्य सहसचिव होते. नंतर त्यांचे वास्तव्य औरंगाबाद येथे झाले. त्यांनी अकोला पक्ष संघटना वाढी करीता अनेक वेळा अकोल्यात आले होते.! कम्युनिस्ट पक्षाचे आदर्श म्हणुन त्यांची प्रचिती होती.! आणि ते खरोखर आदर्शच होते. असा मला मागील ३० ते ४० वर्षे अनुभव आला आहे. पूर्ण वेळ कार्य कर्त्याचे कठोर जीवन त्यांनी अनुभवले असल्याने कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी वैचारिक कोंडमारा ची पूर्ण जाणीव होती. तत्कालीन नेते भाई सुदाम काका देशमुख, भाई मधुकर उतखडे, कॉ. राजेंद्र तायडे, आदी अनेक थोर नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून ते कष्टकरी वर्गासाठी लढले. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.
ते जिल्हा कमिटीच्या बेठकीला येताना पक्ष वांगमय आणणे व विकणे हा त्यांचा आवडता छंद होता.!
महाराष्ट्र गोवा बार निवडणूका ही वकिली व्यवसायातील सिद्धांत कम्युनिस्ट विचारांवर लढले. त्यावेळी अकोला जिल्ह्यात अनेक न्यायालयात मला व कॉ. ऑड. एस.एन. सोनोने, कामगार प्रतिनिधि नयन गायकवाड व अनेक वकील मंडळी यांना त्यांचा प्रचाराची संधी मिळाली जिल्हाने काढलेले पत्रक डिजिटल प्रचार पत्र त्यांना भावले होते. अकोला जिल्यातील अनेक वकिलांशी त्यांची ओळख होती. म गांधीजी यांच्या प्रमाणे ते सत्यवादी व पीडित जनतेचे वकील होते कॉ. मनोहर टाकसाळ यांचे निधन झालेने निर्माण झालेली पक्षात व जनसंघटना मधील पोकळी त्यांचे चिरंजीव कॉ. अभय टाकसाळ व सहकारी निश्चितच भरून काढतील अशी खात्री आहे. रोज बेमौत मरा करते है मरणे वाले मरकर भी नहीं मरते मेहनत कशोके लिये लढणे वाले उपस्थिनानी कॉ. मनोहर टाकसाळ यांना अकोला जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटनाचा अखेरचा लाल सलाम लाल सलाम.!
जब तक सूरज चांद रहेगा कॉ. मनोहर टाकसाळ इनका नाम रहेंगा..!!
कॉ. मनोहर टाकसाळ इनका अधुरा सप्ना हम पूरा करेंगे हम पुरा करेंगे..!!!
असे गगन भेदी नारे लावण्यात आले. सभेचे संचालन कॉ. नयन गायकवाड यांनी केले. सभेत कॉ. रमेश गायकवाड, कॉ. रामदास ठाकरे, कॉ. विद्याधर ढोरे, कॉ. नयन गायकवाड, कॉ. संतोष कुमरे, कॉ. प्रिया वरोटे, कॉ. कल्पना जाधव, कॉ. छाया सावंत, कॉ. माधुरी तायडे, कॉ. कमल तायडे, कॉ. स्वाती गायकवाड, उपस्थित होते..!