तेल्हारा:- तेल्हारा शहरातील बेलखेड रोडवरील निर्माण होणाऱ्या भव्य सभागृहाला स्व. ठाकुरदासजी नंदलालजी तापडीया यांचे नाव देण्याची मागणी वंचीत बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष विकास पवार यांणी निवेदनाव्दारे केली आहे.
स्व. ठाकुदासजी तापडीया यांची तेल्हारा शहराच्या विकासा करीता व जडनघडनात त्यांची महत्वाची भुमीका होती. त्याच प्रमाणे त्यांचे कर्तृत्व खुप मोठे होते. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवुन शहराची बांधनी केली. व आजचे तेल्हारा शहर घडविले अश्या व्यतीच्या नावे तेल्हारा शहरातील ईमारत शोभुन दिसेल, तरी नगरपरिषद तेल्हारा ने स्व. ठाकुरदास नंदलालजी तापडीया यांचे नाव सभागृहास द्यावे आशी मागणी वंचीत बहुजन आघाडी तेल्हारा शहराच्या वतीने करण्यात आली.
या निवेदनावर विकास पवार शहर अध्यक्ष, अशोक दारोकार, प्रविण पोहारकार, मोहम्मद सलीम, सतिष मामनकार, बाबुलालभाऊ पोहरकार, कार्तीक पोहरकार, आकाश पोहरकार, राजपाल वारुळे, राजु पोहरकार, नितीन पोहरकार, यांच्या सह्या आहेत.