• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 20, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

जळगावात दोन मजली इमारत कोसळली; जीवितहानी नाही

Our Media by Our Media
November 11, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
91 1
0
jalgao
14
SHARES
655
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

जळगाव : शहरातील शनिपेठ परिसरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १७ जवळ असलेली जुनी दोन मजली इमारत आज (गुरुवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कोसळली. यामध्ये काही लोक किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यामुळे जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जळगावकर सकाळी गुलाबी थंडीमध्ये गाढ झोपेत असताना शनिपेठ भागामध्ये इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महानगरपालिकेची १७ क्रमांकाची शाळा शनिपेठ परिसरात आहे. त्याच्याच समोर असणारी दोन मजली जुनी इमारत गुरुवारी पहाटे ४ ते ४:३० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. त्यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यासाठी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस माहिती घेण्याचे काम करीत आहेत. यामुळे इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या दोन मजली इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सर्व साहित्य नष्ट झाले आहे. इमारतीमध्ये जसे आवाज व्हायला लागले तसे वरच्या मजल्यावरील काही नागरिक बाहेर यायचा प्रयत्न करू लागले. मात्र ज्या वेळेला इमारत कोसळली तेव्हा खालच्या मजल्यावर असणाऱ्या वृद्ध महिला मात्र अडकून पडल्या. त्यांना जवळच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत दगड व इतर मलबा बाजूला सारीत त्यांना बाहेर काढले.

त्यांच्या शरीराला प्रचंड जखमा झाल्‍या असून मुक्कामार देखील लागला आहे. ही घटना त्याच इमारतीच्या बाजूला असणाऱ्या एका अनधिकृत बांधकामाला सुरुवात झाल्यामुळे घडली असावी असा नागरिकांचा कयास आहे. याबाबत काही नागरिकांनी या पूर्वी पोलीस स्टेशनला देखील तक्रारी दिल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी शशिकांत बारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली. त्यांच्यासोबत संतोष तायडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, प्रदीप धनगर, सरदार पाटील, जगदीश साळुंखे, रवींद्र बोरसे, सोपान जाधव, पन्नालाल सोनवणे, नासिर अली, शौकत अली, नितीन बारी हे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: algaonbuilding collapsesmharashtranashik
Previous Post

एक दशकापेक्षा जास्त काळ उलटून सुद्धा अकोला- पूर्णा ब्रॉडगेज उपेक्षित

Next Post

S T Strike : सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
एसटी ST Bus

S T Strike : सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

108-ambulance-telhara

केवळ डॉक्टर नसल्याने विषप्राशन केलेल्या रूग्णाला 108 मिळाली नाही

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.