• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

Drug Seized Gujarat : द्वारकेत ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त, गुजरात समुद्रकिनारा बनला तस्करीचा मार्ग?

Our Media by Our Media
November 11, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
91 3
0
drugs
28
SHARES
668
VIEWS
FBWhatsappTelegram

द्वारका : गुजरात पोलिसांना द्वारका शहरात मोठी कारवाई केली आहे. देशभरात ड्रग्स प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरा झडत असताना गुजरात पोलिसांनी तब्बल ३५० कोटींचा ड्रग्स साठा जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Drug Seized Gujarat) द्वारका शहरात पकडलेल्या ६६ किलो ड्रग्सची किंमत ३५० कोटी असल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणी गुजरात पोलिसांनी राजस्थानातील एकाला ताब्यात घेतले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा कोणत्या कारणासाठी आणण्यात आला यावर पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, समुद्रामार्गे हा ड्रग्स साठा पुरवला जात असल्याचे पोलिसांकडून शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

Drug Seized Gujarat : द्वारकाचे एसपी सुनील जोशी यांच्या माहितीनुसार

द्वारकाचे एसपी सुनील जोशी यांच्या माहितीनुसार, द्वारका शहराच्या खबालीया हायवेवर आराधना धामच्याजवळ असलेल्या एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, त्या आरोपीजवळ असलेल्या बॅगेत ड्रग्स असल्याचे आढळून आले. दरम्यान त्या व्यक्तीची कसून चौकशी केल्यावर त्याच्याकडे ६६ किलो ड्रग्स आढळले. जवळ जवळ याची किंमत ३५० कोटींच्या आसपास असल्याचे एसपी सुनील जोशी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आरोपीने अद्यापही याबाबत तोंड उघडले नाही. त्याला हा साठा कोठून आला याबाबत विचारल्यास त्याने उत्तर देण्यास नकार दिला. परंतु पोलिसांच्या सुत्रांनुसार हा ड्रग्ससाठा गुजरातच्या समुद्रीमार्गातून आला आहे. गुजरातच्या व्दारका बंदरावर हा साठा आला असल्याचे समजते आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या चपळाईने कारवाई

एसपी सुनील जोशी यांच्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाला याबाबत सुत्रांकडून माहिती मिळाली होती. एक आरोपी १४ ते १५ किलो ड्रग्स द्वारकापासून ते वांकानेरहून राजस्थानला घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी सापळा रचत आरोपीला आपल्या जाळ्यात पकडत ड्रग्स ताब्यात घेतले आहे. आरोपीजवळ असलेल्या बॅगेत १५ किलो ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे. तर ४५ किलोचा मोठा साठाही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. कच्छच्या मुंद्रा बंदरातून २१ हजार कोटी रुपयांची ड्रग्स साठा पकडण्यात आला.

दोन महिन्यांपुर्वी गुजरातमध्ये २१ हजार कोटींचा ड्रग्स साठा जप्त

मागच्या दोन महिन्यांपुर्वी १३ सप्टेंबरला कच्छमधील मुंद्रा बंदरातून २१ हजार कोटी रुपयांचे २९८८ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. अंमली पदार्थांचा हा साठा टॅल्कम पावडरच्या नावाखाली दोन कंटेनरमध्ये इराणच्या अब्बास बंदरातून अफगाणिस्तानातील कंदहारमार्गे मुंद्रा बंदरात पोहोचला होता. याप्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) या प्रकरणाचा तपास करत आहे.

Tags: ahmedabadDrug Seized Gujarat
Previous Post

ST Employees strike : कामावर हजर व्हा; अन्यथा पगार कापू

Next Post

एक दशकापेक्षा जास्त काळ उलटून सुद्धा अकोला- पूर्णा ब्रॉडगेज उपेक्षित

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Next Post
akola

एक दशकापेक्षा जास्त काळ उलटून सुद्धा अकोला- पूर्णा ब्रॉडगेज उपेक्षित

jalgao

जळगावात दोन मजली इमारत कोसळली; जीवितहानी नाही

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.