अकोला: दि.8: आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम एमएचटी-सीईटी सामाईक प्रवेश परिक्षा दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. या कालावधीत काही विद्यार्थी प्रवेश पत्र प्राप्त करूनही परीक्षेस बसू शकले नाहीत. तसेच तांत्रिक अडचणीमुळे परिक्षा पूर्ण करू शकले नाहीत. अशा उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता विद्यार्थ्यांना एक अंतीम संधी म्हणून पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी, बाभुळगाव (जेएच) ए.एच. नं.6 मुर्तिजापूर रोड, अकोला व श्री. इन्फोटेक इन फ्रन्ट ऑफ दत्तराया, पेट्रोल पंप, वाशिम रोड कापसी, जि. अकोला या केंद्रावर शनिवार दि. 9 ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षेची अंतीम संधी म्हणून एमएचटी सीईटी ऑनलाईन परिक्षेकरीता प्रवेशपत्र ऑनलाईन संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावे. प्रवेशपत्रानुसार संबंधीत केंद्रावर शनिवार दि. 9 ऑक्टोबर रोजी परीक्षेकरीता उपस्थित रहावे. तसेच संबंधीत परीक्षेबाबत काही समस्या किंवा अडचण असल्यास जिल्हा संपर्क अधिकारी प्रा. एस.यु. राठोड (मो. क्र. 7875137894) व प्रा. संजय भानसे (मो.क्र. 7875137894) यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक मिरा पागोरे यांनी कळविले आहे.