राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 29 सप्टेंबर : मोबाइलमध्ये गेम (Mobile Game) खेळू नको म्हणून हटकल्याने एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या (16 year old suicide) केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon Buldhana) येथे घडली आहे. दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक सत्र हे ऑनलाइन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिले. मात्र या शिक्षणासोबतच मुलं ऑनलाइन गेमच्या सुद्धा आहारी जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
(Parents stopped to play mobile games, student killed self) बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. त्याला पालकांनी मोबाइलमध्ये गेम खेळू नको म्हणून हटकले होते. त्यानंतर तो रागाच्या भरात घरातून निघून गेला आणि घराशेजारी असलेल्या विहिरीत त्याने उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.